- अजित अगरकर लिहितात...मुंबई टी-२० लीगची जाहिरात करायची झाल्यास ‘ब्रॅन्ड अॅम्बेसडर’ म्हणून आकाश पारकर याची निवड करावी लागेल. अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून शुक्रवारी त्याने नमो बांद्रा ब्लास्टर्सविरुद्ध ईशान्य मुंबई नाईट संघाला शानदार विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात विजयासाठी ४४ धावांची गरज असताना पारकर आणि विनायक भोईर यांनी सामन्याला कलाटणी दिली. विजयानंतर नाईट संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर दाखल झाला आहे. ब्लास्टर्ससाठी ५७ चेंडंूत ७२ धावा ठोकणाऱ्या श्रेयस अय्यरची खेळी पारकरच्या फटकेबाजीपुढे खुजी ठरली. तो या स्पर्धेतील स्टार ठरला आहे. रणजी सामन्यात चेंडूने दमदार कामगिरी करणाºया पारकरने खºया अर्थाने स्वत:ला अष्टपैलू सिद्ध केले. धावा काढणाºया मुंबईच्या पारकरला आपण संघात घेण्यास मुकलो याची खंत वाटत राहावी, अशी देखणी कामगिरी त्याने केली.शिवाजी पार्क लॉयन्स आणि आर्क्स अंधेरी या दुसºया सामन्यात फटकेबाजी पाहायला मिळाली. १५० धावांचा पाठलाग करणारा लॉयन्स संघ सहा गडी राखून विजयी झाला. विजयी संघाचा गोलंदाज सागर त्रिवेदी याने ३४ धावांत तीन गडी बाद करीत आर्क्सच्या फलंदाजीची धार बोथट केली होती.आज रविवारच्या सामन्यानंतर ‘प्ले आॅफ’साठी संघ निश्चित होणार आहेत. जे निकाल येतील त्यानुसार पहिल्या चार स्थानांवर कोण हेदेखील कळून चुकेल. आयपीएल फॉर्मेटनुसार सामने होत असल्याने खरा चॅम्पियन कोण होईल, याचा वेध घेणे कठीण होत आहे.नॉर्थ मुंबई पँथर्सला नमो बांद्रा ब्लास्टर्सविरुद्ध कुठल्याही स्थितीत विजय हवा आहे. श्रेयसच्या नेतृत्वात बांद्रा संघ पँथर्सविरुद्ध दडपणाचा सामना कसा करतो, यावर विजयाचे समीकरण अवलंबून असेल.याशिवाय सोबो सुपरसॉनिक्स आणि शिवाजी पार्क लॉयन्स हा महत्त्वाचा सामना होईल. या सामन्याचा निकाल गुणतालिकेतील आकडेवारी फिरवू शकतो. सुपरसॉनिक्स हा स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट संघ म्हणून वाटचाल करीत असून दुसरीकडे विजय नोंदविण्यासाठी लॉयन्सला सर्वच आघाड्यांवर सरस कामगिरीची गरज राहील. आजच्या सामन्यांचा निकाल अंतिम फेरीत खेळणारे दोन संघ आणि इलिमिनेटर खेळणारे संघ निश्चित करणारा असेल, यात शंका नाही. (पीएमजी)
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आकाश पारकरची कामगिरी लक्षवेधी
आकाश पारकरची कामगिरी लक्षवेधी
मुंबई टी-२० लीगची जाहिरात करायची झाल्यास ‘ब्रॅन्ड अॅम्बेसडर’ म्हणून आकाश पारकर याची निवड करावी लागेल. अखेरच्या चेंडूवर षटकार खेचून शुक्रवारी त्याने नमो बांद्रा ब्लास्टर्सविरुद्ध ईशान्य मुंबई नाईट संघाला शानदार विजय मिळवून दिला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 1:51 AM