Join us  

दबावाचा सहजपणे सामना करतोय - डेव्हिड मिलर

David Miller : आयपीएल विजेत्या गुजरात टायटन्सकडून खेळताना मिलरने ४८१ धावा काढल्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2022 11:34 AM

Open in App

नवी दिल्ली : 'खेळाच्याबाबतीत असलेला माझा दृष्टिकोन आजही एक दशक आधी असल्याप्रमाणेच आहे. पण आता मी माझा खेळ अधिक चांगल्याप्रकारे समजून घेत आहे आणि या जोरावरच मी दबावाचा सहजपणे सामना करण्यात यशस्वी ठरत आहे,' असे दक्षिण आफ्रिकेचा स्टार फलंदाज डेव्हिड मिलर म्हणाला.

आयपीएल विजेत्या गुजरात टायटन्सकडून खेळताना मिलरने ४८१ धावा काढल्या. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये चार सामन्यांमध्ये गुजरातसाठी फिनिशर म्हणून निर्णायक भूमिका बजावली. ९ जूनपासून रंगणाऱ्या भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी मिलर सज्ज झाला आहे.

मिलर म्हणाला की, 'आयपीएल सुरू होण्याआधी माझे लक्ष सर्वाधिक धावा काढण्यासह, संघासाठी फिनिशर म्हणून भूमिका बजावण्याचे होते. मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरल्यावर प्रत्येक फलंदाजाची हीच मानसिकता असते. अशी कामगिरी करण्यात मी यशस्वी ठरलो याचा आनंद आहे. मी काही वेगळा प्रयोग केला असे नाही म्हणणार. मी खूप प्रदीर्घ काळापासून खेळतोय आणि आणि वेळेनुसार प्रत्येकजण परिपक्व होत असतो. आता मी माझा खेळ अधिक चांगल्या प्रकारे समजून घेतो.' मिलर पुढे म्हणाला की, 'मी आताही कधी कधी नर्व्हस होतो आणि नकारात्मक विचार करतो. पण त्याचवेळी आता दबावाचा चांगल्या प्रकारे सामनाही करतो.

आयपीएलमधील कामगिरीचा दबाव नाहीयंदाची आयपीएल शानदार ठरली. या स्पर्धेत केलेल्या शानदार कामगिरीचा भारताविरुद्ध खेळताना माझ्यावर कोणताही दबाव नसेल. अनुभवानुसार दबावाच्या क्षणाचा चांगल्याप्रकारे सामना करतोय. मालदीवमध्ये दोन दिवस घेतलेल्या विश्रांतीचा मोठा फायदा झाला. 

टॅग्स :द. आफ्रिका
Open in App