इंडियन प्रीमिअर लीगच्या १४व्या पर्वाचे ( IPL 2021) उर्वरित सामने इंग्लंडमध्ये खेळवण्याच्या बीसीसीआयच्या हालचाली सुरू आहेत. भारतीय संघ सप्टेंबर महिन्यापर्यंत इंग्लंड दौऱ्यावर आहेत आणि त्यामुळे तेथेच आयपीएल २०२१चे उर्वरित ३१ सामने खेळवण्याचा विचार बीसीसीआयच्या डोक्यात सुरू आहे. त्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली व सचिव जय शाह हेही इंग्लंडला जाणार असल्याची चर्चा आहे. त्यात शुक्रवारी इंग्लंड व वेल्स क्रिकेट बोर्डाच्या ( ECB) नावानं एक परिपत्रक सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे आणि त्यात आयपीएलच्या उर्वरित सामन्यांचे आयोजन करण्यासाठी ECB तयार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. BCCIला २५०० कोटींची चिंता; भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची ECBला विनंती?
बीसीसीआयचे २५०० कोटींचे नुकसान
आयपीएल २०२१चे उर्वरित सामने न झाल्यास बीसीसीआयला जवळपास २५०० कोटींचं नुकसान होईल, असा अंदाज गांगुली ( Sourav Ganguly) यांनी व्यक्त केला. हे नुकसान होऊ नये यासाठी बीसीसीआय लंडन व यूएई या दोन देशांत आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्याचा विचार करत आहे. त्यासाठी बीसीसीआयनं भारत-इंग्लंड कसोटी मालिकेत बदल करण्याची विनंती ECBकडे केल्याची चर्चा आहे. समालोचक हर्षा भोगले यांनी त्यासंदर्भातले ट्विट केले होते, नंतर ते त्यांनी डिलीट केले. बीसीसीआयच्या CEOनी तयार केलेत दोन वेळापत्रक, २९ मेच्या बैठकीत होईल निर्णय
भारत-इंग्लंड मालिकेत बदल करण्याची विनंती?
भारत- इंग्लंड मालिकेला ४ ऑगस्टपासून सुरुवात होईल. बीसीसीआयनं आयपीएलचा दुसरा टप्पा लंडनमध्येच खेळवण्याचा विचार सुरू केला आहे. त्यामुळे त्यांनी ECBकडे भारत-इंग्लंड कसोटी मालिका जुलैमध्ये सुरू करण्याची विनंती केली आहे. जेणेकरून त्यांना आयपीएलसाठी एक अतिरिक्त आठवडा मिळेल. शिवाय एक कसोटी सामना रद्द करण्याचाही प्रस्ताव समोर ठेवल्याची चर्चा आहे. पण, इंग्लंड क्रिकेट बोर्डानं असा कोणताच प्रस्ताव आला नसल्याचे स्पष्ट केले. रवी शास्त्री यांनी कसोटी वर्ल्ड कप जिंकण्यासाठी टीम इंडियाला दिला त्रिसूत्री मास्टरप्लान!
ECBच्या व्हायरल पत्रात काय म्हटले आहे ?
व्हायरल होत असलेल्या पत्रात असे म्हटले आहे की, ''बीसीसीआयकडून आम्हाला मालिकेत बदल करण्याबाबत पत्र मिळालं. त्यानुसार आम्ही आयपीएलच्या उर्वरित सामन्यांच्या आयोजनासाठी तयार आहोत. त्यामुळे या मालिकेतील पाचवा कसोटी सामना आयपीएल २०२१च्या फायनलनंतर म्हणजेच ७ ऑक्टोबरला खेळवण्यात येईल.''
हे पत्र खरंच आहे का?
ECBनं अशा प्रकारचे कुठलेच निवेदन जाहीर केलेले नाही. व्हायरल होत असलेले पत्र खोटे आहे.
Web Title: Fact Check : ECB will host the remainder of the IPL 2021 During September?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.