Join us

Fact Check: हार्दिकसाठी होणारं Boo रोखण्यासाठी MI ने १८,००० विद्यार्थ्यांना स्टेडियमवर आणले?  

आज हार्दिकला boo केले गेले नाही, कारण वानखेडे स्टेडियमवर १८ हजार विद्यार्थी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2024 21:06 IST

Open in App

IPL 2024, Mumbai Indians vs Delhi Capitals Live Marathi : मुंबई इंडियन्सने अखेर आयपीएल २०२४ मध्ये पहिल्या विजयाची नोंद केली. हार्दिक पांड्याला कर्णधार केल्यापासून मुंबई इंडियन्सला चाहत्यांचा रोषाचा सामना करावा लागला आहे. रोहित शर्माला कर्णधार म्हणून हटवल्याचा राग ते स्टेडियमवर हार्दिकला ट्रोल करून काढताना दिसत आहेत. पहिल्या तीन सामन्यांत हेच चित्र दिसले. पण, आज हार्दिकला boo केले गेले नाही, कारण वानखेडे स्टेडियमवर १८ हजार विद्यार्थी प्रेक्षक म्हणून उपस्थित होते. हार्दिकला होणारे ट्रोलिंग रोखण्यासाठी फ्रँचायझीने ही शक्कल लढवल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण, सत्य काही वेगळेच आहे... 

मुंबई इंडियन्सच्या पहिल्या विजयाने RCB ला धक्का; IPL Point Table मध्ये उलथापालथ

रोहित शर्मा ( ४९) व इशान किशन ( ४२) यांनी ८० धावांची भागीदारी करून मुंबईला चांगली सुरुवात करून दिली. पण. अक्षर पटलेने दोघांना बाद केले. हार्दिक पांड्या ( ३९) व टीम डेव्हिड यांनी पाचव्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. डेव्हिडने २१ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४५ धावा केल्या, तर  रोमारियो शेफर्डने  १० चेंडूंत ३९ धावांची नाबाद खेळी केली. मुंबईने ५ बाद २३४ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात दिल्लीला ८ बाद २०५ धावा करता आल्या आणि मुंबईने २९ धावांनी सामना जिंकला. 

 पृथ्वी शॉ ( ६६) आणि अभिषेक पोरेल ( ४१)  यांनी दिल्लीचा डाव सावरला होता. पण, जसप्रीत बुमराहने दोघांना माघारी पाठवले आणि सामना फिरवला.  रिषभ पंत ( १) आज फेल गेला.  त्रिस्तान स्तब्स २७ चेंडूंत ३ चौकार व ७ षटकारांसह ७१ धावांवर नाबाद राहिला. गेराल्ड कोएत्झीने अखेरच्या षटकांत ३ विकेट्स घेतल्या. शेफर्डने १ विकेट घेऊन अष्टपैलू कामगिरी केली आणि त्याला सामनावीर म्हणून गौरविले गेले.  

ESA काय?मुंबई इंडियन्स त्यांच्या घरच्या मैदानावरील एक सामना Education and Sports for All (ESA)  साठी आयोजित करतात. ESA नुसार मुंबईतील विविध NGO च्या मुलांना मुंबई इंडियन्सचा खेळ प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळते आणि आज दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात १८ हजार विद्यार्थी वानखेडे स्टेडियमवर उपस्थित होते.  

टॅग्स :आयपीएल २०२४मुंबई इंडियन्सहार्दिक पांड्यादिल्ली कॅपिटल्स