Join us  

Fact Check :...और दिल में बजी घंटी! 'तिला' पाहून शुबमन गिलनं खरंच दिली का अशी रिॲक्शन, Video Viral 

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये सर्वात निचांक धावसंख्येचा नकोसी विक्रम गुजरात टायटन्सच्या नावावर लिहिला गेला.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 6:29 PM

Open in App

इंडियन प्रीमिअऱ लीग २०२४ मध्ये सर्वात निचांक धावसंख्येचा नकोसी विक्रम गुजरात टायटन्सच्या नावावर लिहिला गेला. दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या लढतीत त्यांचा संपूर्ण संघ ८९ धावांत तंबूत परतला आणि दिल्लीने ८.५ षटकांत हा सामना जिंकून मोठ्या विजयाची नोंद केली. GT चा कर्णधार शुबमन गिल या सामन्यात फक्त ८ धावा करू शकला. पण, या पराभवाची चर्चा सोडून शुबमनच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर हवा आहे. या व्हिडीओत स्टेडियमवरील मोठ्या स्क्रीनवर जेव्हा फॅन गर्ल दिसते, तेव्हा डग आऊटमध्ये बसलेल्या शुबमनची रिअॅक्शन व्हायरल होत आहे. 

शुबमन गिल ( ८), वृद्धीमान सहा ( २), साई सुदर्शन ( १२) आणि डेव्हिड मिलर ( २) हे पॉवर प्लेमध्ये माघारी पारतले. राशिद खानने २३ चेंडूंत ३१ धावा चोपल्याने गुजरातला ८९ धावा तरी करता आल्या.  प्रत्युत्तरात, जॅक फ्रेजर-मॅकगर्कने खणखणीत षटकाराने DCच्या डावाची सुरुवात केली. त्याने १० चेंडूंत २ चौकार व २ षटकारांसह २० धावा चोपल्या. शे होपने १९ धावा केल्या. रिषभने फटकेबाजी करून सामना ९व्या षटकात संपवला. दिल्लीने ६ विकेट्सने हा सामना जिंकला. 

या सामन्यातील व्हायरल होत असलेला व्हिडीओ...    वरील व्हिडीओ खोटा आहे.. खरं तर राहुल तेवातियासाठी जेव्हा DRS घेतला गेला आणि त्यात तो बाद असल्याचे दिसले, तेव्हा शुबमनची ती रिअॅक्शन होती. 

 

टॅग्स :आयपीएल २०२४शुभमन गिलगुजरात टायटन्सदिल्ली कॅपिटल्सऑफ द फिल्ड