IPL 2021: चेन्नई सुपर किंग्सनं ( Chennai Super Kings) सोमवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सवर ( Rajasthan Royals) ४५ धावांनी विजय मिळवला. CSKच्या ९ बाद १८८ धावांचा पाठलाग करताना RRचा संघ ९ बाद १४३ धावा करू शकला. सॅम कुरननं २४ धावांत २, रवींद्र जडेजानं २८ धावांत २, तर मोईन अलीनं ७ धावांत ३ विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं RRच्या सेट फलंदाजांना एकाच षटकात माघारी पाठवून सामन्याला कलाटणी दिली. त्याच षटकात सुरेश रैनानं ( Suresh Raina) जडेजाचा गळा धरल्याचा प्रसंग घडला आणि तोच फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दोघांमधील वादाची चर्चा सुरू झाली आहे. चेन्नईच्या विजयानंतर चर्चा असेल तर रवींद्र जडेजाच्या भन्नाट सेलिब्रेशनची, Video
प्रथम फलंदाजी करताना फॅफ ड्यू प्लेसिस ( ३३) , मोईन अली ( २६) , अंबाती रायुडू ( २७) व सुरेश रैना ( १८) यांनी CSKसाठी मजबूत पाया उभारून दिला. ड्वेन ब्राव्होनं ८ चेंडूंत नाबाद २० ( २ चौकार व १ षटकार) धावा करून चेन्नईला ९ बाद १८८ धावांचा समाधानकारक पल्ला गाठून दिला. राजस्थान रॉयल्सकडून जोस बटलर ३५ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ४९ धावा केल्या. पण, रवींद्र जडेजा व मोईन अली यांनी एकामागून एक धक्के आणि सामना फिरला. राजस्थानला ९ बाद १४३ धावांवर समाधान मानावे लागले. सर रवींद्र जडेजा कॅच घेण्यासाठी धावत नाहीत, तर...; महेंद्रसिंग धोनीचं ८ वर्षांपूर्वीचं ट्विट व्हायरल
नेमकं काय घडलं?२ बाद ८७ धावा अशा सुस्थितीत असलेल्या राजस्थानला १२व्या षटकात मोठे धक्के बसले. जडेजानं टाकलेल्या त्या षटकात पहिल्याच चेंडूवर जोस बटलरचा त्रिफळा उडाला. महत्त्वाची विकेट घेतल्यानंतर सुरेश रैना जडेजाकडे धावत आला आणि अन्य सहकाऱ्यांप्रमाणे जल्लोष करू लागला. पण, सर्व सहकारी माघारी जात असताना रैनानं जडेजाचा गळा पकडला. त्यावरून त्यांच्यात वाद झाल्याची चर्चा रंगली, परंतु तसं काहीच झालं नाही. मैत्री मैत्रीत त्यानं ही कृती केली. टेम्पो चालकाचा मुलगा, RCBचा नेटबॉलर अन् IPL 2021चा स्टार; चेतन सकारियानं केलीय धोनी, रैना, राहुल यांची शिकार!
पाहा व्हिडीओ..