Fact Check : विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा?; महेंद्रसिंग धोनीसारखीच १५ ऑगस्टची केली निवड!

मागच्या वर्षी याच दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2021 03:30 PM2021-08-15T15:30:52+5:302021-08-15T15:31:22+5:30

whatsapp join usJoin us
Fact Check: Virat Kohli announces retirement ?; Like Mahendra Singh Dhoni, he was selected on 15th August! | Fact Check : विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा?; महेंद्रसिंग धोनीसारखीच १५ ऑगस्टची केली निवड!

Fact Check : विराट कोहलीची निवृत्तीची घोषणा?; महेंद्रसिंग धोनीसारखीच १५ ऑगस्टची केली निवड!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

देशभरात आज ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचा (Celebration 15th Auguest 2021) उत्साह पाहायला मिळत आहे. मागच्या वर्षी याच दिवशी भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंग धोनीनं ९० कसोटींत ४८७६ धावा ( ६ शतकं/३३ अर्धशतकं), ३५० वन डेत १०७७३ ( १० शतकं/७३ अर्धशतकं) धावा केल्या आहेत. ९८ ट्वेंटी-२०त त्याच्या नावावर १६१७ धावा आहेत. धोनीनं १५ ऑगस्ट २०२०ला एक ट्विट केलं आणि त्यात त्यानं म्हटलं होतं की, आज सायंकाळी ७.२९ मिनिटांनी मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून मुक्त समजा... त्याच्या या पोस्टनं सर्वांना धक्का बसला होता. आज धोनीच्या निवृत्तीला एक वर्ष पूर्ण होत आहे आणि आज विराट कोहलीच्या निवृत्तीचं ट्विट व्हायरल झालं आहे. 

३०,००० रुपये दिवसाचं भाडं, दुबईतील आलिशान हॉटेलमध्ये थांबलेत CSKचे खेळाडू; पाहा Photo

भारतीय संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि कसोटी मालिकेतील दुसरा सामना लॉर्ड्सवर खेळवला जात आहे. लॉर्ड्स कसोटीचा आज चौथा दिवस आहे आणि भारताच्या ३६४ धावांच्या प्रत्युत्तरात इंग्लंडनं पहिल्या डावात ३९१ धावा करताना २७ धावांची आघाडी घेतली आहे. कर्णधार जो रूट १८० धावांवर नाबाद राहिला. आज चौथ्या दिवशी भारताच्या फलंदाजांची कसोटी आहे. चौथ्या दिवसावर पावसाचं संकट दिसत असल्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांना फायदा मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. अशात सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ट्विटनं टीम इंडियाच्या चाहत्यांची झोप उडाली आहे.

ट्विटरवर व्हायरल होत असलेला फोटो हा फेक म्हणजेच बनावटी आहे. या ट्विटमध्ये विराटनं आज सायंकाळी ७.२९ वाजल्यापासून मला निवृत्त समजा असा मजकूर लिहिलेला आहे. एका युजर्सनं धोनीच्या निवृत्तीचा मजकूर आणि विराटचा ट्विटर प्रोफाइल एकत्र करून हा फोटो तयार केला आहे. विराटनं अशी कोणतीच अधिकृत घोषणा केलेली नाही. 
 

Web Title: Fact Check: Virat Kohli announces retirement ?; Like Mahendra Singh Dhoni, he was selected on 15th August!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.