CSK चा स्फोटक फलंदाज Faf Du Plessisनं जाहीर केली निवृत्ती; जाणून घ्या तो काय म्हणाला...

Faf du Plessis announces retirement from Test cricket फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून बुधवारी अचानक निवृत्ती घेतली

By स्वदेश घाणेकर | Published: February 17, 2021 11:06 AM2021-02-17T11:06:28+5:302021-02-17T11:07:00+5:30

whatsapp join usJoin us
Faf du Plessis announces retirement from Test cricket, says he's shifting focus to T20s | CSK चा स्फोटक फलंदाज Faf Du Plessisनं जाहीर केली निवृत्ती; जाणून घ्या तो काय म्हणाला...

CSK चा स्फोटक फलंदाज Faf Du Plessisनं जाहीर केली निवृत्ती; जाणून घ्या तो काय म्हणाला...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

दक्षिण आफ्रिका आणि चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) स्फोटक फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून बुधवारी अचानक निवृत्ती घेतली. त्याच्या या निर्णयानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आफ्रिकेचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर आहे आणि त्यांना दोनही कसोटी सामन्यांत हार पत्करावी लागली. आफ्रिकेनं दुसरा कसोटी सामना हातचा गमावला. फॅफनं इंस्टाग्रावर पोस्ट लिहून कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याचे जाहीर केलं. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनंही या वृत्ताला दुजोरा देणारं ट्विट केलं. ( Faf du Plessis announces retirement from Test cricket) IPL 2021 Auction Rules: ८ फ्रँचायझी २९२ खेळाडूंवर लावणार बोली; पण करावं लागेल ६ नियमांचं काटेकोर पालन, अन्यथा...

त्यानं पोस्ट लिहिली की,''हे वर्ष अनेकांसाठी संघर्षमय ठऱलं. हा अनिश्चिततेचा काळ होता, परंतु याच काळानं मला नेमकं काय करायचंय, हे शिकवलं.  माझं मनानं मला स्पष्ट सांगितलं आहे आणि आता नवीन सुरुवात करण्याची हीच वेळ आहे. देशासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली, हे मी भाग्य समजतो. पण, आता कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची हीच योग्य वेळ आहे,''असे फॅफनं सांगितले. भारतीय क्रिकेटपटूला अभिनेत्रीचा होकार मिळवण्यासाठी करावी लागली ११ महिन्यांची प्रतीक्षा!

''१५ वर्षांपूर्वी मला तू दक्षिण आफ्रिकेकडून ६९ कसोटी सामने खेळशील आणि कर्णधारपद भूषवशील, असे कुणी मला सांगितले असते तर त्यावर विश्वासच ठेवला नसता. या प्रवासात अनेक चढउतार पाहिले, ''असेही तो म्हणाला. फॅफनं ६९ कसोटी सामन्यांत ४१६३ धावा केल्या आहेत. त्यात १० शतकं व २१ अर्धशतकांचा समावेश आहे. IPL 2021 : मुंबई इंडियन्सच्या स्फोटक फलंदाजानं घेतला क्रिकेटमधून ब्रेक; डॉक्टरांनी दिला सल्ला


ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर लक्ष
पुढील दोन वर्ष होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी मला हा निर्णय घ्यावा लागत आहे. मला मर्यादित षटकांच्या क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. याचा अर्थ वन डे क्रिकेट हे लक्ष नाही, असा होत नाही. पण, मला ट्वेंटी-20 क्रिकेटवरच जास्त लक्ष द्यायचे आहे, असेही फॅफनं सांगितलं.

Web Title: Faf du Plessis announces retirement from Test cricket, says he's shifting focus to T20s

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.