Faf Du Plessis Dinesh Karthik, IPL 2022 RCB vs SRH Live: टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा घेतलेला निर्णय RCBच्या फलंदाजांनी सार्थ ठरवला. कर्णधार फॅफ डू प्लेसीसची नाबाद ७३ धावांची खेळी आणि दिनेश कार्तिकचा फिनिशिंग टच याच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने सनरायझर्स हैदराबाद संघाला १९३ धावांचे आव्हान दिले. SRH कडून जगदीश सुचिथने ३० धावांत सर्वाधिक २ बळी घेतले.
RCB कडून प्रथम फलंदाजी करण्यासाठी विराट कोहली आणि फॅफ डू प्लेसिस मैदानात उतरले. डावाच्या पहिल्याच चेंडूवर विराट झेलबाद झाला आणि शून्यावर माघारी परतला. त्यानंतर डू प्लेसिस आणि रजत पाटीदार जोडीने १०५ धावांची भागीदारी केली. रजत पाटीदार अर्धशतकाजवळ असताना त्याला बाद व्हावे लागले. त्याने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार खेचत ४८ धावा केल्या. त्याच्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने २४ चेंडूत ३३ धावांची वेगवान खेळी केली. संघाचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने संपूर्ण २० षटके खेळून ५० चेंडूत ७३ धावा केल्या. त्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. त्यातच दिनेश कार्तिकने डावाला फिनिशिंग टच दिला. त्याने ८ चेंडूत ४ षटकार आणि एका चौकारासह नाबाद ३० धावा केल्या.