Join us  

Faf Du Plessis : फॅफ ड्यू प्लेसिसची तुफान फटकेबाजी, ११ चेंडूंत कुटल्या ५० धावा; CSK फॅफसाठी ओतणार पैसा, Video

चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) माजी सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं IPL 2022 Mega Auction पूर्वी दमदार खेळी करून फ्रँचायझींचे लक्ष वेधवे आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 3:50 PM

Open in App

चेन्नई सुपर किंग्सचा ( CSK) माजी सलामीवीर फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf Du Plessis) यानं IPL 2022 Mega Auction पूर्वी दमदार खेळी करून फ्रँचायझींचे लक्ष वेधवे आहे. आयपीएलच्या १५ व्या पर्वासाठी ( IPL 2022) CSKनं रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी, मोईन अली आणि ऋतुराज गायकवाड यांना ताफ्यात कायम राखले. यावेळी संघाच्या विजयात सिंहाचा वाटा उचलणाऱ्या फॅफ ड्यू प्लेसिसला CSKनं बाहेर ठेवले, परंतु मेगा ऑक्शनमध्ये चेन्नई फॅफ ड्यू प्लेसिसला ताफ्यात घेण्यासाठी पैसा नक्की ओततील, हेही खरं आहे. त्यात फॅफची बॅट अजूनही दमदार कामगिरी करून दाखवतेय. 

बांगलादेश प्रीमिअर लीगमध्ये ( BPL 2022) Comilla Victorians संघाचे प्रतिनिधित्व करताना फॅफनं चौकार - षटकारांची आतषबाजी केली. कोमिल्ला व्हिक्टोरीयन्स संघानं या कामगिरीच्या जोरावर चत्तोग्राम चॅलेंजर्स ( Chattogram Challengers ) संघावर ५२ धावांनी विजय मिळवला. व्हिक्टोरियन्सच्या ३ बाद १८३ धावांचा पाठलाग करताना चॅलेंजर्सचा संघ १७.१ षटकांत १३१ धावांत गडगडला. 

प्रथम फलंदाजी करताना व्हिक्टोरियन्सकडून लिटन दास, कॅमेरून डेल्पोर्ट आणि फॅफ यांनी फटकेबाजी केली. लिटन दासनं ३४ चेंडूंत ५ चौकार  व १ षटकारांसह ४७ धावा, तर डेल्पोर्टनं २३ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या फॅफनं ५५ चेंडूंत ८३ धावा चोपताना चौकार ( ८) व षटकारानं  ( ३) ११ चेंडूंत ५० धावा कुटल्या. प्रत्युत्तरात चॅलेंजर्सकडून विल जॅक्सची ६९ धावांची खेळी वगळता अन्य फलंदाज अपयशी ठरले. नहिदूल इस्लामनं ३, तर मुस्ताफिजूर     रहमान, तन्विर इस्लाम व शोहिदूल इस्लाम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

फॅफ ड्यू प्लेसिसची IPL मधील कामगिरी फॅफनं १०० आयपीएल सामन्यांत ३४.९४च्या सरासरीनं २९३५ धावा केल्या आहेत. त्यानं २२ अर्धशतकं झळकावलीत, तर २६५ चौकार व ९६ षटकार खेचले. २०२१च्या पर्वात त्यानं १६ सामन्यांत ६३३ धावा केल्या होत्या. 

टॅग्स :एफ ड्यु प्लेसीसबांगलादेशआयपीएल २०२१चेन्नई सुपर किंग्स
Open in App