पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League) दुखापतींचे सत्र सुरूच आहे. शुक्रवारी आंद्रे रसेल याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तर शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) याच्यासोबत सामना सुरू असताना अपघात घडला. क्यूएट्टा ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators ) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फॅफची क्षेत्ररक्षणादरम्यान सहकारी खेळाडूसोबत टक्कर झाली. सीमारेषेवर चेंडू अडवताना फॅफनं डाईव्ह मारली, त्याचवेळी समोरून दुसरा खेळाडू वेगानं धावत आला अन् त्याचा गुडघा फॅफड्या डोक्यावर जोरात आदळला. त्यानंतर फॅफ बराच वेळ मैदानावर आडवा पडला होता आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले, Faf du Plessis was shifted to the hospital for tests
ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी यांच्यातल्या सामन्यातील 19 व्या षटकात हा अपघात झाला. अबु धाबी येथील शेख जायेद स्टेडियमवर हा सामना सुरू होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चपळ क्षेत्ररक्षकांमध्ये फॅफचे नाव आघाडीवर आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना फॅफने अनेक अफलातून झेल व अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेले सर्वांनी पाहिले आहेत. शनिवारी असेच अफलातून क्षेत्ररक्षण त्यानं केलं आणि संघासाठी चार धावा वाचवल्या, परंतु सहकारी खेळाडू मोहम्मद हसनैन याचा गुडघा त्याच्या डोक्यावर जोरात आदळला.
ग्लॅडिएटर्सच्या फिजिओनं फॅफवर प्राथमिक उपचार केले आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले.
पाहा व्हिडीओ...
आंद्रे रसेलला स्ट्रेचरवरुन रुग्णालयात नेण्याची वेळ
वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज आंद्र रसेल (Andre Russell) याला पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) पहिल्याच सामन्यात दुखापतीला सामोरं जावं लागलं आहे. क्वेटा ग्लेडिएटर्सकडून (Quetta Gladiators) खेळताना रसेल याला इस्लामाबाद युनायडेटचा गोलंदाज मोहम्मद मूसा यानं टाकलेला चेंडू हेल्मेटवर आदळल्यानं दुखापत झाली. क्षेत्ररक्षणावेळी देखील तो मैदानात दिसला नाही. त्याच्या जागी संघात नसीम शाह याला खेळविण्यात आलं.
आंद्रे रसेल याला फलंदाजीवेळी सामन्याच्या १४ व्या षटकात दुखापत झाली. विशेष म्हणजे मोहम्मद मूसाच्या गोलंदाजीवर सलग दोन षटकार रसेलनं ठोकले. पण त्यानंतरचा स्लोअर वन चेंडू लक्षात न आल्यानं तो रसेलच्या हेल्मेटवर आदळला. त्यानंतर फिजिओनं मैदानात येऊन रसेलला तपासलं. दुखापतीनंतरही रसेल यानं फलंदाजी करणं सुरू ठेवलं. पण पुढच्याच चेंडूवर वर तो थर्ड मॅनवर झेल देऊन बसला आणि माघारी परतला. ६ चेंडूत १३ धावा करुन रसेल बाद झाला. पण इस्लमाबाद संघाचा डाव सुरू झाल्यावर रसेल क्षेत्ररक्षणासाठी मैदानात दिसला नाही. रसेल याला स्ट्रेचरवरून रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली. त्यामुळे रसेलच्या जागी नसीम शाहला खेळविण्यात आलं.
Web Title: Faf du Plessis shifted to hospital for tests after colliding with player during PSL match while fielding, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.