Caribbean Premier League 2022 मध्ये गुरुवारी फॅफ ड्यू प्लेसिसची ( Faf Du Plessis ) वादळी खेळी पाहायला मिळाली. सेंट ल्युसिया किंग्स संघाचे नेतृत्व सांभाळणाऱ्या फॅफने शतकी खेळी करताना गयाना अॅमेझॉन वॉरियर्स संघाच्या गोलंदाजांची धुलाई केली. त्याच्या शतकी खेळीत १० चौकार व ६ षटकारांचा समावेश होता, परंतु दुर्दैवाने वॉरियर्सने ६ विकेट्स राखून हा सामना जिंकला ( Guyana Amazon Warriors won by 6 wickets vs St Lucia Kings ) आणि फॅफचे शतक व्यर्थ ठरले. आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सचे प्रतिनिधित्व करणारा शिमरोन हेटमायर CPL मध्ये वॉरियर्सचा कर्णधार आहे. वॉरियर्सने सांघिक खेळ करताना हा विजय मिळवला.
0,6,6,6,6,6! Mumbai Indiansच्या नव्या भिडूने Kiron Pollardच्या गोलंदाजांना धू धू धुतले
सेंट ल्युसिया किंग्सकडून फॅफ वगळता निरोशान डिकवेला चांगला खेळला. बाकी खेळाडू २० धावांचा टप्पाही ओलांडू शकले नाहीत. मार्क डेयाल भोपळ्यावर माघारी परत्यानंतर फॅफ व डिकवेला यांनी दुसऱ्या विकेटसाठी १३२ धावांची भागीदारी केली. डिकवेला ३६ धावांवर माघारी परतल्यानंतर फॅफला अन्य फलंदाजांनी साथ दिलीच नाही. रॉस्टन चेस याने तळाच्या फलंदाजांमध्ये सर्वाधिक १७ धावा केल्या. फॅफन ५९ चेंडूंत १० चौकार व ६ षटकारांसह १०३ धावांची खेळी केली आणि संघाला ५ बाद १९४ धावांपर्यंत मजल मारून दिली. शाकिब अल हसनने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रत्युत्तरात वॉरियर्सकडून सांघिक खेळ झाला. रहमनुल्लाह गुरबाज व चंद्रपॉल हेमराज यांनी पहिल्या विकेटसाठी ८१ धावांची सलामी दिली. हेमराज २९ धावांवर बाद झाल्यानंतर गुरबाज व शाय होप यांनी वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. गुरबाजने २६ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांसह ५२ धावा केल्या, तर होपने ३० चेंडूंत २ चौकार व ५ षटकारांसह नाबाद ५९ धावा चोपल्या. कर्णधार हेटमायर ३ ६ धावा करून माघारी परतला. वॉरियर्सने १९.२ षटकांत ४ बाद १९५ धावा करून सामना जिंकला. किंग्सचे गोलंदाज अपयशी ठरले.