पाकिस्तान सुपर लीगमध्ये ( Pakistan Super League) दुखापतींचे सत्र सुरू आहे. शुक्रवारी आंद्रे रसेल याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तर शनिवारी दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज फॅफ ड्यू प्लेसिस ( Faf du Plessis) याच्यासोबत सामना सुरू असताना अपघात घडला. क्यूएट्टा ग्लॅडिएटर्स ( Quetta Gladiators ) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या फॅफची क्षेत्ररक्षणादरम्यान सहकारी खेळाडूसोबत टक्कर झाली. सीमारेषेवर चेंडू अडवताना फॅफनं डाईव्ह मारली, त्याचवेळी समोरून दुसरा खेळाडू वेगानं धावत आला अन् त्याचा गुडघा फॅफड्या डोक्यावर जोरात आदळला. त्यानंतर फॅफ बराच वेळ मैदानावर आडवा पडला होता आणि त्याला लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. फॅफच्या दुखापतीबाबतचे अपडेट्स रविवारी हाती आले.
इंग्लंडच्या फलंदाजाची खतरनाक खेळी; 17 चेंडूंत कुटल्या 90 धावा, षटकरांचा पाऊस पाडून गोलंदाजांना केलं हैराण
ग्लॅडिएटर्स विरुद्ध पेशावर झाल्मी यांच्यातल्या सामन्यातील 19 व्या षटकात हा अपघात झाला. अबु धाबी येथील शेख जायेद स्टेडियमवर हा सामना सुरू होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील चपळ क्षेत्ररक्षकांमध्ये फॅफचे नाव आघाडीवर आहे. इंडियन प्रीमिअर लीगमध्येही चेन्नई सुपर किंग्सकडून खेळताना फॅफने अनेक अफलातून झेल व अप्रतिम क्षेत्ररक्षण केलेले सर्वांनी पाहिले आहेत. शनिवारी असेच अफलातून क्षेत्ररक्षण त्यानं केलं आणि संघासाठी चार धावा वाचवल्या, परंतु सहकारी खेळाडू मोहम्मद हसनैन याचा गुडघा त्याच्या डोक्यावर जोरात आदळला.
दरम्यान फॅफनं ट्विट करून त्याच्या दुखापतीबाबत अपडेट्स दिले. त्यानं लिहिलं की, माझ्या काळजीपोटी प्रार्थना करणाऱ्या प्रत्येकाचे आभार. मी हॉस्पिटलमधून हॉटेलमध्ये परतलो आहे. त्या अपघातानंतर थोडासा स्मृतीभ्रंश झाला होता, परंतु मी आता ठिक आहे. लवकरच मैदानावर उतरेन, अशी आशा आहे.