संथ खेळपट्टीवर ठरलो अपयशी - मॉर्गन 

‘संथ खेळपट्टीनुसार अपयशी ठरलो,’ अशी कबुली देत मॉर्गन म्हणाला, ‘ही खेळपट्टी पहिल्या सामन्यातील खेळपट्टीच्या तुलनेत वेगळी होती. अशा स्थितीत खेळून व चुकांपासून बोध घेत आम्ही उत्कृष्ट कामगिरी करु .

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 03:54 AM2021-03-16T03:54:55+5:302021-03-16T06:54:42+5:30

whatsapp join usJoin us
Failed on a slow pitch said Morgan | संथ खेळपट्टीवर ठरलो अपयशी - मॉर्गन 

संथ खेळपट्टीवर ठरलो अपयशी - मॉर्गन 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अहमदाबाद : ‘संथ खेळपट्टीवर आमच्या उणिवा भारताने दुसऱ्या सामन्यात चव्हाट्यावर आणल्या. मात्र, अशा खेळपट्ट्यांवर खेळूनच टी-२० विश्वचषकाची तयारी करावी लागेल,’ असे पराभवानंतर इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन म्हणाला.

‘संथ खेळपट्टीनुसार अपयशी ठरलो,’ अशी कबुली देत मॉर्गन म्हणाला, ‘ही खेळपट्टी पहिल्या सामन्यातील खेळपट्टीच्या तुलनेत वेगळी होती. अशा स्थितीत खेळून व चुकांपासून बोध घेत आम्ही उत्कृष्ट कामगिरी करु . यंदाच्या टी-२० विश्वचषकासाठी अशा खेळपट्ट्यांवर यशस्वी होण्याचे उपाय शोधावे लागतील. वेगवान माऱ्यास अनुकूल खेळपट्टी असेल, असा माझा अंदाज होता; पण आम्ही अपयशी ठरलो.’

भारतीय संघाला बसला दंड
- इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या टी-२० सामन्यात संथ गतीने गोलंदाजी केल्याने यजमान भारताला आयसीसीने दंड दिला. 
- आयसीसीने केलेल्या या कारवाईमुळे भारतीय क्रिकेटपटूंच्या सामना मानधानापैकी २० टक्के रक्कम दंड भरावा लागेल. निर्धारीत वेळेत एक षटक कमी टाकल्याने मॅच रेफ्रीचे आयसीसी एलिट पॅनल सदस्य जवागल श्रीनाथ यांनी भारतीय संघाला दंड ठोठावला. 
- आयसीसीने माहिती देताना सांगितले की, ‘नियमानुसार संथ गतीने गोलंदाजी केल्यास सामना मानधनाच्या २० टक्के दंड लावण्यात येतो. कर्णधार कोहलीने ही चूक मान्य केली असल्याने पुढील सुनावणीची गरज पडणार नाही.’
 

Web Title: Failed on a slow pitch said Morgan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.