फलंदाजीतील अपयशाने पराभव

पहिला कसोटी सामना इंग्लंडने ३१ धावांनी जिंकला. हा सामना खूपच रोमांचक होता.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2018 04:09 AM2018-08-05T04:09:24+5:302018-08-05T04:10:29+5:30

whatsapp join usJoin us
Failure of batting failure | फलंदाजीतील अपयशाने पराभव

फलंदाजीतील अपयशाने पराभव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- अयाझ मेमन />पहिला कसोटी सामना इंग्लंडने ३१ धावांनी जिंकला. हा सामना खूपच रोमांचक होता. बॅट आणि बॉल यांच्यात चांगलीच स्पर्धा रंगली. खेळपट्टीचे कौतुक करावे लागेल. कारण दोन्ही संघांना खेळपट्टीची मदत मिळाली. मी म्हणेल खेळपट्टीची मदत गोलंदाजांना मिळाली. काही खेळाडूंची कामगिरी शानदार होती. त्यात विराट कोहलीचे नाव सर्वात पुढे घ्यावे लागेल. त्याने या सामन्यात दोन्ही डावात मिळून दोनशे धावा केल्या. त्याशिवाय कुणीही अर्धशतक झळकावू शकले नाही. मला वाटते, की भारताच्या गोलंदाजांबाबत कुणीही तक्रार करणार नाही. त्यांनी २० गडी बाद केले. दुसऱ्या डावात इंग्लंडला २०० च्या आतच रोखले. १९४ चे आव्हान या खेळपट्टीवर कठीण होते, मात्र अशक्य नक्कीच नव्हते. अपयशाचे मुख्य कारण फलंदाज होते. इंग्लंडचा विजय झाला याचे कारण आहे, की भारताचे फलंदाज फारशी कामगिरी करू शकले नाही. विराट हा त्यात अपवाद होता. त्याने पहिल्या डावात १४९ आणि दुसºया डावात ५१ धावा केल्या. हार्दिक पंड्यानेही आज चांगला खेळ केला. मात्र इतर फलंदाजांची कामगिरी फारशी समाधानकारक नव्हती. दोन्ही संघांच्या विजयात हीच बाब महत्त्वाची ठरली.
आज चौथ्या दिवशी जर कोहली आणि कार्तिक यांच्यात भागीदारी झाली असती तर सामना भारताच्या बाजूने झुकला असता. ८४ धावांची गरज होती. पाच गडी बाद झाले होते. त्यामुळे फलंदाजांवर तणाव होता. खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना साथ देत होती. इंग्लिश गोलंदाजांनी याआधीच पहिल्या डावात या परिस्थितीत ते किती धोकादायक आहेत, हे दाखवून दिले होते. तरीही विराट कोहली आत्मविश्वासाने खेळला. मात्र चौथ्या दिवशी पहिल्याच षटकात कार्तिक बाद झाला तेव्हा तणाव वाढला. मात्र विराट खेळपट्टीवर आहे तोपर्यंत सामना भारताच्या बाजूने फिरू शकतो असे वाटले. मात्र कोहली बाद झाला आणि स्टोक्सचा जबरदस्त स्पेल झाला. इंग्लंड संभाव्य विजेते आहेत. त्यांचे फलंदाजही फार चांगले खेळले असे नाही. मात्र धावफलक पाहिला तर दोन्ही संघांच्या फलंदाजांतील फरक दिसून येईल. इंग्लंडच्या खेळीत सातत्य आहे. भारताच्या विराट कोहलीनंतर जर दुसºया क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या पंड्याची ३१ आहे.
चांगल्या सुरुवातीचे रूपांतर फलंदाज मोठ्या खेळीत करू शकले नाही. ही समस्या कोहली आणि शास्त्री यांनाच सोडवावी लागेल.
कोहलीशिवाय गोलंदाजांनी चांगला खेळ केला. आश्विनच्या परदेशातील कामगिरीवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. त्यात सहा आघाडीचे गोलंदाज आहेत. कुकला दोन्ही डावात झटपट तंबूत पाठवले. त्यासोबतच ईशांत शर्मानेही चांगली कामगिरी केली. पाच गडी घेतले. शमीनेही पहिल्या डावात चांगला खेळ केला. शमी आणि आश्विन यांच्यावर कामगिरीबाबत प्रश्न उपस्थित होत होता. शमीचा कौटुंबिक वाद आणि आश्विनची परदेशातील कामगिरी हे प्रश्न होते. मात्र दोघांनीही चांगला खेळ केला.
बुमराह आणि भुवनेश्वर असते तर कदाचित शमी आणि ईशांतला संधी मिळाली नसती. गोलंदाजांनी आपली चांगली कामगिरी केली. गेल्या पाच कसोटी सामन्यांत त्यांनी १०० टक्के कामगिरी केली. कोहलीशिवाय इतर फलंदाज काहीही करू शकले नाहीत. कोहली आणि शास्त्री यांना फलंदाजीवर तोडगा काढावा लागेल. इंग्लंडमध्ये जर सलामीवीर धावा करू शकत नाहीत, तर मधल्या फळीवर ताण येतो. तसेच स्लिप कॅचिंगवरही भारताला काम करावे लागेल.
(संपादकीय सल्लागार)
 

Web Title: Failure of batting failure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.