- अयाझ मेमन
कसोटी मालिकेत झालेल्या ०-२ अशा पराभवानंतर भारतीय संघासाठी न्यूझीलंड दौरा अत्यंत निराशाजनक ठरला. टी२० मालिकेत यजमानांना ५-० असा व्हाइटवॉश दिल्यानंतर, भारतासाठी हा दौरा अत्यंत यशस्वी ठरेल असे वाटले होते. मात्र, यानंतर यजमानांनी जबरदस्त मुसंडी मारताना आधी एकदिवसीय मालिका ३-० अशी जिंकली आणि यानंतर कोहली अँड कंपनीवर पूर्ण वर्चस्व मिळवताना दोन्ही कसोटी सामने मोठ्या फरकाने जिंकले. भारताने किमान एक कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेसाठी महत्त्वपूर्ण ६० गुण मिळवायला पाहिजे होते, पण परिस्थितीनुसार खेळ करताना, लढवय्या खेळ करताना आणि लौकिकानुसार खेळ करताना भारतीय संघ कधीच दिसला नाही. या दौऱ्यातील निराशाजनक कामगिरीमुळे यावेळी अनेक प्रमुख खेळाडूंचे गुणही घसरले.
>मयांक अगरवाल (१० पैकी ४)
मयांक कसोटी मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला. पहिल्या कसोटीतील अर्धशतकानंतर मयांककडून अपेक्षा वाढल्या होत्या, पण दुसºया कसोटीत ज्या पद्धतीने तो बाद झाला, त्याने पुन्हा एकदा त्याच्या तंत्रावर प्रश्न निर्माण झाले.
पृथ्वी शॉ (१० पैकी ४)
पृथ्वीला त्याच्या जवळपास सर्वच डावांमध्ये चांगली सुरुवात मिळाली, पण दुर्दैवाने त्याला या संधी फायदा घेत मोठी खेळी करण्यात यश आले नाही. आखूड टप्प्यांच्या चेंडूंचा सामना करताना पृथ्वी अडचणीत दिसला.
चेतेश्वर पुजारा (१० पैकी ३.५)
पुजाराने खेळपट्टीवर सर्वाधिक वेळ घालवताना दोन्ही संघांतून तो सर्वाधिक चेंडू खेळणारा फलंदाज ठरला, पण तरीही त्याला म्हणावी तशी छाप पाडता आली नाही, शिवाय आपल्या संघालाही मजबूत स्थितीत आणता आले नाही. इतर फलंदाजांप्रमाणे पुजाराही लेट स्विंगविरुद्ध अडखळला.
मोहम्मद शमी (१० पैकी ५)
पहिल्या कसोटीत शमीला गोलंदाजीस पोषक खेळपट्टीवरही लयबद्ध आणि अचूक मारा करता आला नाही. मालिकेच्या सुरुवातीला बºयापैकी मारा केल्यानंतर शमीने गोलंदाजीची लय गमावली.
जसप्रीत बुमराह (१० पैकी ५.५)
मालिकेतील अखेरच्या डावात अत्यंत भेदक मारा करत बुमराहने आपली गुणवत्ता दाखवली. दुखापतीतून सावरून पुनरागमन केल्यानंतर त्याला लक्षवेधी मारा करण्यासाठी वेळ लागला. एकूणच मालिकेतील कामगिरी त्याच्या लौकिकास साजेशी नव्हती.
>अजिंक्य रहाणे (१० पैकी २.५)
पहिल्या कसोटीत रहाणे जबरदस्त फॉर्ममध्ये दिसला, त्याला दुसºया कसोटीत आपला फॉर्म कायम राखण्यात अपयश आले. यावेळी तो पूर्णपणे अपयशी ठरला. वॅगनरच्या शॉर्ट पिच माºयापुढे रहाणे अडखळला.
हनुमा विहारी (१० पैकी २.५)
दुसºया कसोटीत विहारीने झुंजार अर्धशतक झळकावले. मात्र, मालिकेत क्वचितच त्याने लक्ष वेधले. हिरवळ खेळपट्टीमुळे गोलंदाजीची संधी कमी मिळाली, पण क्षेत्ररक्षणातही म्हणावी तशी चमक दिसली नाही.
रिषभ पंत (१० पैकी २)
फलंदाजीचे चांगले कौशल्य असल्यामुळे अनुभवी रिद्धिमान साहाऐवजी पंतला संघात स्थान मिळाले, पण त्याला अपेक्षित कामगिरी करता आली नाही. इतर फलंदाजांप्रमाणे पंतही वेगवान माºयापुढे अडखळला. यष्टीरक्षणात अजूनही पूर्ण सुधारणा झालेली नाही.
>विराट कोहली
(१० पैकी १.५ गुण)
२०१४ साली झालेल्या इंग्लंड दौºयानंतर हा दौरा कोहलीच्या कारकिर्दीत एक फलंदाज म्हणून अत्यंत वाईट दौरा ठरला. त्याचप्रमाणे, जागतिक क्रमवारीतील अव्वल असलेल्या संघाचा कर्णधार म्हणूनही तो प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व मिळविण्यात अपयशी ठरला. स्विंग आणि सीम माºयापुढे तो झगडताना दिसला. सातत्याने त्याच्याकडून होणाºया चुकांमुळे किवी संघाचा आत्मविश्वास उंचावत गेला.
>रविचंद्रन अश्विन
(१० पैकी २.५)
पहिल्या कसोटीत खेळताना अश्विनला आपल्या लौकिकानुसार खेळ करता आला नाही. याशिवाय फलंदाजी व क्षेत्ररक्षणातही तो चमक दाखवू शकला नाही. संघातील स्थान भक्कम करण्यासाठी त्याला प्रत्येक विभागात सातत्यपूर्ण कामगिरी करावी लागेल.
रवींद्र जडेजा (१० पैकी ७)
क्षेत्ररक्षणात जडेजाने कमालीचे लक्ष वेधले. खास करून वॅगनरचा जबरदस्त झेल घेत, त्याने क्रिकेटविश्वाला अचंबित केले. कसोटी मालिकेतील हा लक्षवेधी क्षणांपैकी एक क्षण ठरला. याशिवाय फलंदाजी व गोलंदाजीतही जडेजाने चमक दाखवली.
ईशांत शर्मा (१० पैकी ७)
टाचेच्या दुखापतीतून सावरल्यानंतर पहिल्या कसोटीत ईशांतने अर्धा संघ बाद केला. मात्र, पुन्हा एकदा दुखापत उफाळून आल्याने तो संघाबाहेर गेला आणि भारताला फटका बसला. जडेजाशिवाय ईशांत हाच भारताकडून मालिकेत छाप पाडू शकला.
उमेश यादव (१० पैकी ४)
ईशांत दुखापतग्रस्त झाल्याने अंतिम संघात उमेशला स्थान मिळाले. वेगवान मारा केला खरा. मात्र, लेट स्विंग करण्यात त्याला अपयश आले. त्याने काही बाउन्सरचा माराही केला. मात्र, त्याने फार काही फरक पडला नाही.
(कन्सल्टिंग एडिटर लोकमत)
Web Title: Failure of major batsmen to worry
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.