ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित झाल्यानंतर इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13 व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर ही स्पर्धा संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याचे, आयपीएल गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी सांगितले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) त्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आयपीएल होणार असल्याने क्रिकेट चाहत्यांमध्ये एक उत्साह संचारला आहे. खेळाडूंसह चाहतेही सप्टेंबरची आतुरतेनं वाट पाहत आहेत. आयपीएल होणार हे जाहीर होताच, सोशल मीडियावर आयपीएल संपूर्ण वेळापत्रक म्हमून एक PDF व्हायरल होत आहे. पण, हे खरंच आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक आहे का?
IPL 2020 : विराट कोहलीची चिंता वाढवणारी बातमी; MS Dhoni, Rohit Sharma यांनाही टेंशन!
यंदाची आयपीएल 29 मार्चपासून सुरू होणार होते, परंतु कोरोना व्हायरसमुळे दोन वेळा आयपीएल स्थगित करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप यांच्या निर्णयावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून होते. पण, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर या दोन्ही स्पर्धा स्थगित करण्यात आल्यानं आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. ब्रिजेश पटेल यांनी ही स्पर्धा यूएई येथे होणार असल्याचे जाहीर केले. थोड्या दिवसांनंतर त्यांनी आयपीएलची तारीखही जाहीर करून टाकली. त्यानुसार 19 सप्टेंबरला पहिला सामना आणि 8 नोव्हेंबरला अंतिम सामना खेळवण्यात येणार आहे.
IPL 2020 मध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची रोज कोरोना टेस्ट करा; फ्रँचायझी मालकाची मागणी
पटेल यांच्या निर्णयानंतर आयपीएलचं पूर्ण वेळापत्रकाची PDF व्हायरल झाली आहे. त्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स यांच्यात सलामीचा सामना सायंकाळी 8 वाजता होणार असल्याचे दिसत आहे. रविवारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातील डबल हेडर सामने रंगणार आहेत. पण, हे वेळापत्रक अधिकृत नाही. या आठवड्यात बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊंसिल यांची बैठक होणार आहे आणि त्यात अधिकृत वेळापत्रक जाहीर केले जाणार आहे, असे पटेल यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. त्यामुळे व्हायरल होत असलेले वेळापत्रक फेक ( चुकीचे) आहे.