T20 World Cup : शमीची एन्ट्री होताच पाकिस्तानचे धाबे दणाणले, अनुभवी फलंदाजाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी बोलावले

T20 World Cup, Change in Pakistan Squad : BCCI ने  शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. जसप्रीत बुमराहच्या जागी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याचा मुख्य संघात समावेश करण्याचा निर्णय BCCI ने घेतला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 08:39 PM2022-10-14T20:39:13+5:302022-10-14T20:39:33+5:30

whatsapp join usJoin us
Fakhar Zaman included in Pakistan's T20 World Cup 2022 squad and Usman Qadir has been moved to the traveling reserves.  | T20 World Cup : शमीची एन्ट्री होताच पाकिस्तानचे धाबे दणाणले, अनुभवी फलंदाजाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी बोलावले

T20 World Cup : शमीची एन्ट्री होताच पाकिस्तानचे धाबे दणाणले, अनुभवी फलंदाजाला वर्ल्ड कप खेळण्यासाठी बोलावले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Change in Pakistan Squad : BCCI ने  शुक्रवारी महत्त्वाची घोषणा केली. जसप्रीत बुमराहच्या जागी अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी याचा मुख्य संघात समावेश करण्याचा निर्णय BCCI ने घेतला. नोव्हेंबर २०२१ पासून ट्वेंटी-२० क्रिकेटपासून दूर असलेल्या शमीने आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करून दाखवली होती. आता राष्ट्रीय संघात पुनरागमन करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात त्याच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान असणार आहे. भारतीय संघातील या बदलानंतर पाकिस्तानच्या ताफ्यातही बदल करण्यात आला आणि त्यांनी अनुभवी फलंदाजाला वर्ल्ड कप संघात दाखल करून घेतले.

आशिया चषक २०२२ स्पर्धेत फ्लॉप ठरलेल्या फखर जमानचा ( Fakahar Zaman) पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात समावेश करण्यात आला आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने ही घोषणा केली आहे. उस्मान कादीरच्या जागी जमानची निवड केली गेली आहे. कादीर दुखापतीतून अद्याप सावरला नसल्याने हा निर्णय घेतला गेला आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत कादीरच्या उजव्या अंगठ्याला दुखापत झाली होती. हा लेगस्पिनर आता २२ ऑक्टोबरपर्यंत निवडीसाठी उपलब्ध नसणार आहे.

फखर आणि शाहिन शाह आफ्रिदी शनिवारी लंडनमध्ये दाखल होणार आहेत आणि इंग्लंड ( १७ ऑक्टोबर) व अफगाणिस्तान ( १९ ऑक्टोबर) यांच्याविरुद्धच्या सराव सामन्यात ही दोघं खेळतील. २३ ऑक्टोबरला पाकिस्तानचा पहिला सामना भारताशी होणार आहे.

पाकिस्तानचा संघ - बाबर आजम, शाबाद खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तिखार अहमद, शुखदील शाह, मोहम्मद हस्नैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसिम ज्यु., नसीम शाह, शाहिन शाह आफ्रिदी, शान मसूद ( Pakistan squad: Babar Azam (C), Shadab Khan, Asif Ali, Fakhar Zaman, Haider Ali, Haris Rauf, Iftikhar Ahmed, Khushdil Shah, Mohammad Hasnain, Mohammad Nawaz, Mohammad Rizwan, Mohammad Wasim Jnr, Naseem Shah, Shaheen Shah Afridi and Shan Masood.) राखीव - मोहम्मद हॅरीस, शाहनवाज दहानी, उस्मान कादीर 

पाकिस्तानचे वेळापत्रक
२३ ऑक्टोबर  - वि. भारत,  मेलबर्न
२७ ऑक्टोबर - वि. ब गटातील विजेता, पर्थ
३० ऑक्टोबर - वि. अ गटातील उपविजेता, पर्थ
३ नोव्हेंबर - वि. दक्षिण आफ्रिका, सिडनी
६ नोव्हेंबर - वि. बांगलादेश, एडिलेड 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Fakhar Zaman included in Pakistan's T20 World Cup 2022 squad and Usman Qadir has been moved to the traveling reserves. 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.