नवी दिल्ली : भारतीय संघाचा माजी फिरकीपटू अमित मिश्राने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो नेहमी काही ना काही कारणावरून चर्चेत असतो. अमित मिश्रा सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतो. तसेच क्रिकेट वर्तुळात घडणाऱ्या घडामोंडीवर तो भाष्य देखील करत असतो. आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यावरून देखील त्याने मोहम्मद रिझवान करत असलेल्या सततच्या अपीलवरून त्याने त्याची खिल्ली उडवली होती. नेहमी चाहत्यांच्या संपर्कात असलेल्या मिश्राला चाहते वेगवेगळे ट्विट करून त्याला प्रश्न विचारत असतात. अशातच एका चाहत्याने मिश्रा याच्याकडे अशी मागणी केली, ते पाहून सोशल मीडियावरील सर्वचजण आश्चर्यचकित झाले आहेत.
दरम्यान, सध्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजचा थरार रंगला आहे. पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात सुरेश रैनाने शानदार झेल पकडला. रैनाचा हा अप्रतिम झेल पाहून मिश्रा देखील आश्चर्यचकित झाला आणि त्याने रैनाच्या झेलचा व्हिडीओ शेअर करत त्याचे कौतुक करणारे ट्विट केले. यानंतर मिश्राच्या याच ट्विटवर एका चाहत्याने त्याला उघडपणे गुगल पेवर 300 रूपये पाठविण्यास सांगितले. या चाहत्याने लिहिले की, "सर 300 रूपये गुगल पे करा 2 मैत्रीणींना फिरायला घेऊन जायचे आहे."
लक्षणीय बाब म्हणजे या चाहत्याच्या ट्विटला मिश्राही प्रतिसाद देईल अशी कोणी कल्पनाही केली नसावी. पण मिश्राने मोठे मन दाखवत या चाहत्याची मागणी पूर्ण केली. अमित मिश्राने गुगल पेद्वारे या चाहत्याला 500 रुपये पाठवले आणि त्याचा स्क्रीनशॉट आपल्या ट्विटरवर शेअर केला. त्याचा स्क्रीनशॉट पाहून नेटकरी अमित मिश्राचे खूप कौतुक करत आहेत.
रैनाने जुन्या आठवणींना दिला उजाळा
रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीज 2022 बद्दल भाष्य करायचे झाले तर, या स्पर्धेच्या पहिल्या उपांत्यफेरीच्या सामन्यात इंडिया लीजेंड्च्या सुरेश रैनाने अप्रतिम झेल घेऊन जुन्या आठवणींना उजाळा दिला. त्याने ऑस्ट्रेलियाचा दिग्गज माजी अष्टपैलू खेळाडू शेन वॉटसनचा झेल घेतला. रैनाच्या या झेलचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सर्व महत्त्वाच्या घडामोडींसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल क्रमांकाची मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Fan asked for Rs 300 to turn his girlfriend around, Amit Mishra paid Rs 500
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.