मुंबई इंडियन्सची साथ सोडून पाकिस्तानमध्ये ज्यूस पिण्यासाठी पोहोचला रोहित शर्मा?; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2021 03:34 PM2021-09-28T15:34:03+5:302021-09-28T15:36:40+5:30

whatsapp join usJoin us
Fan Spot Rohit Sharma's doppelganger on Pakistan Streets   | मुंबई इंडियन्सची साथ सोडून पाकिस्तानमध्ये ज्यूस पिण्यासाठी पोहोचला रोहित शर्मा?; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

मुंबई इंडियन्सची साथ सोडून पाकिस्तानमध्ये ज्यूस पिण्यासाठी पोहोचला रोहित शर्मा?; जाणून घ्या व्हायरल फोटोमागचं सत्य

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्यात मुंबई इंडियन्सला ( Mumbai Indians) सलग तीन पराभवांचा सामना करावा लागला आहे. १० सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात ८ गुण झाले असून आता ते ७व्या क्रमांकावर आहेत. त्यामुळे आता त्यांना प्रत्येक सामना जिंकावाच लागणार आहे. गतविजेत्यांच्या कामगिरीवर सारेच नाराज आहेत, खुद्द कर्णधार रोहित शर्माही ( Rohit Sharma) प्रचंड निराश आहे. पण, त्यानं संघ नेमहीप्रमाणे कमबॅक करेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. मात्र, आज रोहित शर्मा चर्चेत आला आहे आणि ही चर्चा आयपीएलशी संबंधित नाही. 

खरंच रोहित शर्मा पाकिस्तानमध्ये पोहोचलाय?
सोशल मीडियावर आज एक फोटो तुफान व्हायरल झाला आहे आणि त्यात रोहित शर्मासारखी दिसणारी व्यक्ती पाकिस्तानच्या रस्त्यांवर ज्यूस पित असल्याचा दावा केला गेला आहे.  एका युजरनं हा फोटो पोस्ट करून लिहिलं की, कोण म्हणतं पाकिस्तान सुरक्षित नाही?






 
मुंबई इंडियन्स पंजाबविरुद्ध आज तरी जिंकणार?
सलग तीन सामने गमावलेल्या गतविजेत्या मुंबई इंडियन्सची बाद फेरी गाठण्याची वाटचाल अडचणीत आली आहे. मंगळवारी मुंबईकरांना सातत्यपूर्ण कामगिरीचा अभाव असलेल्या पंजाब किंग्सविरुद्ध भिडायचे आहे. या सामन्यात बाजी मारून संघाची गाडी विजयी मार्गावर आणण्याचा प्रयत्न मुंबईकर करतील.

यूएईमध्ये आयपीएलचे उर्वरित सामने सुरू झाल्यापासून मुंबईकरांची कामगिरी खालावली आहे. यामुळे त्यांची चौथ्या स्थानावरून सातव्या स्थानी घसरण झाली आहे. मात्र, पिछाडीवर पडल्यानंतर जबरदस्त पुनरागमन करण्यात तरबेज असलेला मुंबई संघ काहीही करू शकतो, याची पूर्ण जाणीव असल्याने पंजाब संघालाही पूर्ण ताकदीने जोर लावावा लागेल. मुंबईसाठी चिंतेची बाब आहे ती मधल्या फळीचे अपयश. सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांचे अपयश महागडे ठरत आहे.

Web Title: Fan Spot Rohit Sharma's doppelganger on Pakistan Streets  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.