Join us

'माझ्यासोबत डेटवर येशील का?'; मयंती लँगरने दिले असे उत्तर

मयंतीसारख्या सेलिब्रिटींना अनेकदा फॅन्सच्या प्रश्नांमुळे किंवा प्रतिक्रियांमुळे अडचणींचा सामनाही करावा लागतो.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 08:50 IST

Open in App

मुंबई: स्पोर्ट्स अँकर मयंती लँगर हे नाव भारतीय क्रीडा रसिकांना सुपरिचीत आहे. क्रिकेट अँकरिंगसोबत तिचे सौदर्यं हे कायम अनेकांच्या चर्चेचा विषय असते. त्यामुळेच अनेकांचा 'क्रश' असणाऱ्या मयंती लँगरचे सोशल मीडियावर अनेक फॅन्स आहेत. परंतु, मयंतीसारख्या सेलिब्रिटींना अनेकदा फॅन्सच्या प्रश्नांमुळे किंवा प्रतिक्रियांमुळे अडचणींचा सामनाही करावा लागतो. मात्र,  मयंती लँगर सोशल मीडियावर उलट सुलट प्रश्न विचारणाऱ्यांना अनेकदा सडेतोड उत्तर देऊन क्लीन बोल्ड करते. नुकताच असा एक प्रसंग घडला. एका व्यक्तीने ट्विटरवर मयंतीला, माझ्यासोबत डिनर डेटवर येशील का?, असे विचारले. त्यावर मयंतीने दिलेले उत्तर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. एकूणच ट्विटरकर मयंतीच्या या अंदाजावर फिदा झाले आहेत. या व्यक्तीने ट्विटमध्ये म्हटले होते की‘तुम्हाला पाहिल्यानंतर मला आयपीएल पाहिल्याचं दुख: होत नाही. तुम्ही व्यक्तीमत्व आणि क्लास या दोन्हीचं मिश्रण आहात. मला तुम्हाला डिनरसाठी घेऊन जाण्याची इच्छा आहे. तुम्ही किती सुंदर आहात हे मी सांगू शकत नाही’. या ट्विटला उत्तर देताना मयंतीने म्हटले की, ‘धन्यवाद..मला आणि माझ्या पतीला तुमच्यासोबत येणं नक्की आवडेल’. मयंतीच्या या गुगलीनंतर संबंधित व्यक्तीला बहुधा योग्य तो संदेश गेला असावा. त्यामुळे ही व्यक्ती पुन्हा ट्विट करण्याच्या फंदात पडली नाही.