Join us

"नवीन जॉबसाठी अभिनंदन...", पृथ्वी शॉनं फोटो पोस्ट करताच चाहत्यांनी घेतली शाळा

आयपीएल २०२३ चा हंगाम काही भारतीय युवा खेळाडूंना एक नवीन ओळख देऊन गेला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2023 15:37 IST

Open in App

नवी दिल्लीआयपीएल २०२३ चा हंगाम काही भारतीय युवा खेळाडूंना एक नवीन ओळख देऊन गेला. रिंकू सिंग, आकाश मधवाल, यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांसारख्या शिलेदारांनी चमकदार कामगिरी करून सर्वांना प्रभावित केले. आयपीएलच्या सोळाव्या हंगामात आपल्या फलंदाजीने गोलंदाजांना घाम फोडून स्वत:ला सिद्ध करण्याचे आव्हानही काही भारतीय खेळाडूंसमोर होते. यातीलच एक नाव म्हणजे पृथ्वी शॉ. पण,  आयपीएलचा सोळावा हंगाम पृथ्वीसाठी एका वाईट स्वप्नाप्रमाणे राहिला. कारण त्याला आठ सामन्यांत केवळ १०६ धावा करता आल्या.

मागील मोठ्या कालावधीपासून भारतीय संघातून बाहेर असलेला पृथ्वी खराब फॉर्मचा सामना करत आहे. पृथ्वीचा खराब फॉर्म देखील दिल्ली कॅपिटल्सच्या पराभवाचे कारण ठरले. खरं तर आयपीएल २०२३ मध्ये दिल्लीच्या संघाला आपल्या सुरूवातीच्या पाच सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. क्रिकेटपासून दूर असलेला पृथ्वी सध्या सुट्टीचा आनंद घेत आहे. त्याने आता एक फोटो पोस्ट केला असून त्यावरून चाहते त्याला ट्रोल करत आहेत. खरं तर भारतीय खेळाडूने इंजिनिअर्ससोबत एक फोटो शेअर केला आहे.

चाहत्यांनी घेतली शाळा 

पृथ्वी शॉट्रोल

पृथ्वी शॉच्या फोटोवर चाहते काही भन्नाट कमेंट करत आहेत. 'नवीन जॉबसाठी अभिनंदन', 'करिअरची चांगली निवड केली आहेस', 'भाई इंजिनिअर बनून इंजिनिअर्सचे करिअर खराब करू नकोस', अशा भन्नाट प्रतिक्रिया चाहते देत आहेत. 

टॅग्स :पृथ्वी शॉट्रोलआयपीएल २०२३सोशल व्हायरल
Open in App