Join us  

मोहालीत विराट कोहलीला चाहत्यांचा त्रास! सुरक्षारक्षकांकडे केली तक्रार, नेमकं काय घडलं?

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट करिअरमध्ये १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी विराट कोहली सज्ज झाला आहे. मोहालीत भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी खेळविण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2022 5:08 PM

Open in App

मोहाली-

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेट करिअरमध्ये १०० वा कसोटी सामना खेळण्यासाठी विराट कोहली सज्ज झाला आहे. मोहालीत भारत विरुद्ध श्रीलंका पहिली कसोटी खेळविण्यात येणार आहे. यासाठी विराट कोहलीनं मोहालीत दाखल झाला असून त्यानं सरावाला देखील सुरुवात केली आहे. रविवारी कोहलीनं मोहालीच्या पीसीए स्टेडियममध्ये दोन तास नेट्समध्ये घाम गाळला. यावेळी भारतीय संघाचा यष्टीरक्षक रिषभ पंतनेही त्याच्यासोबत सराव केला. पण सरावावेळी एका घटनेनं विराट कोहली खूप संतापला आणि त्यानं थेट स्टेडियमच्या सुरक्षारक्षकांकडे तक्रार नोंदवली. विराट कोहलीच्या चाहत्यांनी स्टेडियम परिसरात गदारोळ केला आणि यामुळे कोहली त्रासलेला पाहायला मिळाला. 

समोर आलेल्या माहितीनुसार, विराट कोहली ज्यावेळी नेट्समध्ये सराव करत होता त्यावेळी पीसीए स्टेडियमच्या गेट नंबर-९ च्या बाहेर चाहत्यांनी विराटला पाहण्यासाठी खूप गर्दी केली होती. त्यांनी विराट-विराट अशी नारेबाजी करण्यास सुरुवात केली आणि यामुळे सरावात व्यत्यय येत असल्याचं लक्षात आल्यानं कोहलीनं याची तक्रार थेट स्टेडियमच्या सुरक्षा व्यवस्थापकांकडे केली. 

आपल्या १०० व्या कसोटी सामन्याच्या तयारीसाठी जोमानं तयारी करत असलेल्या विराट कोहली जेव्हा चाहत्यांच्या नारेबाजीनं त्रासला गेला तेव्हा त्यानं स्टेडियममध्ये उपस्थित सुरक्षा रक्षकांकडे याची तक्रार केली. त्यानंतर सुरक्षारक्षकांनी चाहत्यांना गेटच्या बाहेर लोटलं. गर्दी कमी झाल्यानंतर विराटनं पुन्हा सरावाला सुरुवात केली. 

विराट कोहली आणि रिषभ पंत रविवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास सराव करण्यासाठी स्टेडियममध्ये दाखल झाले होते. वॉर्मअप झाल्यानंतर विराट फलंदाजीच्या सरावासाठी नेट्समध्ये आला. त्यानंतर विराटनं मोहम्मद शमी, उमेश यादव, शुबमन गिल यांचीही भेट घेतली. नेट्समध्ये विराट थ्रो बॉलवर फटका मारण्याचा सराव करत होता. नेट्समध्ये हनुमा विहारी, जयंत यादव, सौरभ कुमार आणि इतर खेळाडूंनी तीन तास घाम गाळला. 

टॅग्स :विराट कोहलीभारत विरुद्ध श्रीलंकाबीसीसीआय
Open in App