Join us  

IND vs ENG: "आता पराभव निश्चित", उपांत्य फेरीसाठी अम्पायरांची नाव जाहीर होताच चाहत्यांनी व्यक्त केली चिंता!

टी-20 विश्वचषकाचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 07, 2022 5:17 PM

Open in App

नवी दिल्ली : टी-20 विश्वचषक 2022 मधील दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड (IND vs ENG) यांच्यात गुरुवारी 10 नोव्हेंबर रोजी डिलेडच्या मैदानावर होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यासाठी पंचांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल यांची मैदानी पंच म्हणून निवड करण्यात आली आहे. थर्ड अम्पायर म्हणून ख्रिस गॅफनी, फोर्थ अम्पायर म्हणून रॉड टकर आणि सामनाधिकारी म्हणून डेव्हिड बून यांची निवड झाली आहे. खरं तर या मोठ्या सामन्यापूर्वी पंचांची नावे समोर आल्यानंतर सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. लक्षणीय बाब म्हणजे कुमार धर्मसेना यांचे नाव पाहताच भारतीय चाहत्यांनी चिंता व्यक्त केली आहे. 

दरम्यान, पंचांची नावे जाहीर होताच ट्विटरवर अनेक चाहत्यांनी कुमार धर्मसेना यांना ट्रोल केले. एका युजरने कुमार धर्मसेना यांचा पक्षपाती असा उल्लेख केला आहे. त्याचवेळी आणखी एका युजरने स्पष्ट शब्दात लिहिले की, आता इंग्लंडचा संघ उपांत्य फेरीत सहज विजय मिळवेल, संदर्भ = कुमार धर्मसेना. एकूणच भारतीय चाहत्यांनी कुमार धर्मसेना यांच्यावर नाराजी व्यक्त केली आहे. 

वादग्रस्त निर्णयामुळे धर्मसेना ट्रोलसाल 2019 मध्ये एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला गेला. या सामन्यादरम्यान कुमार धर्मसेना यांनी एक वादग्रस्त निर्णय दिला होता, ज्याची किंमत किवी संघाला विजेतेपद गमावून चुकवावी लागली. याशिवाय कुमार धर्मसेना यांनी यापूर्वी देखील अनेकवेळा असे वादग्रस्त निर्णय दिले आहेत. त्यामुळे चाहते त्यांना ट्रोल करत आहेत. 

13 तारखेला होणार अंतिम सामनारविवारी टी-20 विश्वचषकात अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. नवख्या नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून पाकिस्तानचा फायदा करून दिला. त्यानंतर झालेल्या सामन्यात पाकिस्तानने बांगलादेशचा पराभव करून उपांत्य फेरीत धडक मारली. उपांत्य फेरीतील पाकिस्तानचा सामना 9 नोव्हेंबर रोजी न्यूझीलंडविरूद्ध होणार आहे. तर 10 तारखेला दुसरा उपांत्य फेरीचा सामना भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळवला जाईल. तर या स्पर्धेचा अंतिम सामना 13 नोव्हेंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावर होईल. 

पाकिस्तान विरूद्ध न्यूझीलंड सामन्यासाठी अम्पायर - (9 नोव्हेंबर) 

  • फिल्ड अम्पायर - मारेस इरास्मस आणि रिचर्ड इलिंगवर्थ
  • थर्ड अम्पायर - रिचर्ड कॅटलब्रो
  • फोर्थ अम्पायर - मायकेल गफ
  • मॅच रेफरी - ख्रिस ब्रॉड

 

भारत विरूद्ध इंग्लंड सामन्यासाठी अम्पायर - (10 नोव्हेंबर) 

  • फिल्ड अम्पायर - कुमार धर्मसेना आणि पॉल रीफेल
  • थर्ड अम्पायर - ख्रिस गॅफनी
  • फोर्थ अम्पायर - रोड टकर
  • मॅच रेफरी - डेव्हिड बून

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंडट्रोलसोशल मीडियाऑफ द फिल्ड
Open in App