Join us  

विराटमुळे गमावली चाहत्याने गर्लफ्रेन्ड, मैदानावरच झळकलं पोस्टर

हर्षल पटेल याने ११ धावांत दोन गडी बाद करताच विराट कोहलीने त्याच्या डोक्याचे चुंबन घेतले.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2022 5:18 AM

Open in App

केकेआरविरुद्धची बाजी आरसीबीने तीन गडी राखून जिंकली. सामन्यादरम्यान अनेक अविस्मरणीय क्षण अनुभवायला मिळाले.  दिनेश कार्तिकने आंद्रे रसेलला षटकार खेचून सामना संंपवताच रसेल मैदानावरच झोपला. हर्षल पटेल याने ११ धावांत दोन गडी बाद करताच विराट कोहलीने त्याच्या डोक्याचे चुंबन घेतले. त्याचवेळी प्रेक्षक गॅलरीतील एका चाहत्याने लक्ष वेधले. त्याने जे पोस्टर झळकाविले त्यावर लिहिले होते, ‘माझ्या गर्लफ्रेन्डने कोहलीमुळे मला सोडले! कारण माझ्याकडे कोहलीसाठी गर्लफ्रेन्डपेक्षा अधिक वेळ होता.’

मॅक्सवेलचा हनीमून कधी संपेल?

केकेआरवर विजय मिळविताना आरसीबीची बुधवारी चांगलीच दमछाक झाली. हा विजय पॅसेंजर गाडीसारखा होता, या शब्दात चाहत्यांनी आरसीबीच्या कामगिरीवर तोंडसुख घेतले. कार्तिकने अखेरच्या षटकात षटकार आणि चौकार मारून १२९ धावांचे लक्ष्य गाठून दिले पण तेदेखील पॅसेंजर ट्रेन सारखेच... यावर एका चाहत्याने लिहिले, ‘मॅक्सवेलचा (आरसीबीचा आक्रमक फलंदाज) हनीमून कधी संपेल? मॅक्सवेलने नुकताच विवाह केला असून तो हनीमूनसाठी संघाबाहेर आहे. 

आला रे आला... सूर्या आला!

मुंबई : दुखापतीतून पूर्णपणे सावरल्यानंतर विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केलेला स्टार फलंदाज सूर्यकुमार यादव याचे मुंबई इंडियन्स संघात पुनरागमन झाले आहे. यामुळे आता मुंबईच्या मधल्या फळीला बळकटी आली. गुरुवारी सूर्याने आपल्या संघात प्रवेश केला. गेल्या महिन्यात वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेदरम्यान बोटाला दुखापत झाल्याने सूर्याला भारतीय संघाबाहेर जावे लागले होते. यानंतर तो दुखापतीतून सावरण्यासाठी बंगळुरु  येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) गेला होता. २७ मार्चला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सूर्या खेळू शकला नाही;  परंतु आता शनिवारी राजस्थान रॉयल्सविरुद्ध तो उपलब्ध असेल. मुंबई इंडियन्सने माहिती दिली की, ‘सूर्यकुमार यादवने आपल्या विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे. 

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघआयपीएल २०२२रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
Open in App