भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मधल्या फळीचा आधारस्थान असलेल्या युवीनं टीम इंडियाला अनेक अशक्यप्राय विजय मिळवून दिले. 2007 चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि 2011च्या वन डे वर्ल्ड कप विजयात युवीचा सिंहाचा वाटा होता. 2007च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये त्यानं इंग्लंडविरुद्ध केलेली फटकेबाजी आजही सर्वांच्या लक्षात आहे. युवीनंतर टीम इंडियाला मधल्या फळीत सक्षम पर्याय शोधता आला नाही आणि त्याचा फटका आपल्याला 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत बसला, हे सर्वांनाच माहित आहे. पण, बुधवारी सोशल मीडियावर अचानक #MissYouYuvi हे ट्रेंड होऊ लागले.
युवीनं गतवर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. कॅन्सरवर मात करून युवी क्रिकेटच्या मैदानावर उतरला, परंतु त्याला कामगिरीत सातत्य राखण्यात अपयश आलं. 2017मध्ये त्यानं अखेरचा वन डे व ट्वेंटी-20 सामना खेळला. त्यानं 40 कसोटी सामन्यांत 1900 धावा आणि 9 विकेट्स घेतल्या आहेत. त्यानं 304 वन डे व 58 ट्वेंटी-20 सामन्यांत अनुक्रमे 8701 व 1177 धावांसह 111 व 28 विकेट्स घेतल्या आहेत. युवीनं गतवर्षी बरोबर आजच्याच दिवशी निवृत्ती जाहीर केली होती. निवृत्तीच्या एका वर्षानिमित्तानं सोशल मीडियावर #MissYouYuvi हे ट्रेंड होत आहे.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
महेंद्रसिंग धोनीनं दिलं पक्ष्याला जीवदान; कन्येनं सांगितली संपूर्ण हकिकत!
पाकिस्ताननं 'आशिया चषक' आयोजनाचा हट्ट सोडला; या देशात होणार यंदाची स्पर्धा!
दिल्ली सरकार पहिल्या दिवसापासून खोटं बोलतंंय; खासदार गौतम गंभीरचा 'स्ट्रेट ड्राईव्ह'
शोएब अख्तरनं निवडले टॉप 10: भारत-पाकिस्तान ऑल टाईम खेळाडूंमध्ये धोनी, गांगुली यांना स्थान नाही
बाबो; ऐतिहासिक विजयाच्या आनंदात 'तिनं' केलं न्यूड फोटोशूट; सोशल मीडियावर धुमाकूळ