jasprit bumrah injury । मुंबई : भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मागील मोठ्या कालावधीपासून क्रिकेटपासून दूर आहे. न्यूझीलंडमध्ये झालेल्या शस्त्रक्रियेनंतर बुमराह सध्या विश्रांती घेत आहे. तसेच सध्या सुरू असलेल्या आयपीएलच्या १६व्या हंगामाला देखील तो मुकणार आहे. खरं तर बुमराह शेवटच्या वेळी सप्टेंबरमध्ये भारताकडून खेळला होता. दुखापतीमुळे त्याला आशिया चषक आणि ट्वेंटी-२० विश्वचषक यांसारख्या मोठ्या स्पर्धांना मुकावे लागले.
दरम्यान, जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात बुमराह खेळणार का याबाबत देखील संभ्रम आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी चॅम्पियनशिपची फायनल होणार आहे. क्रिकेटपासून दूर असलेल्या बुमराहने पत्नी संजना गणेशनसोबत एका कार्यक्रमाला हजेरी लावली. नीता अंबानी यांच्या कार्यक्रमात बुमराह दिसल्याने चाहत्यांनी त्याला ट्रोल केल्याचे पाहायला मिळाले. या कार्यक्रमात बुमराहसह, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग यांनी देखील हजेरी लावली होती.
नीता अंबानींच्या कार्यक्रमाला बुमराहची हजेरी
जसप्रीत बुमराहचा फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. त्यांनी त्याच्या दुखापतीवरच प्रश्न उपस्थित करताना भन्नाट मीम्स व्हायरल केले. बुमराहच्या अनुपस्थितीमुळे मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा झटका बसला आहे. मुंबईच्या संघाने या हंगामात बुमराहच्या गैरहजेरीत संदीप वॉरियर्सला संघात स्थान दिले आहे.
१६ व्या हंगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ - रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, इशान किशन, जोफ्रा आर्चर, टीम डेव्हिड. डेवॉल्ड ब्रेव्हिस, हृतिक शोकिन, अर्जुन तेंडुलकर, अर्शद खान, तिलक वर्मा, जेसन बेहरेनडॉर्फ, कुमार कार्तिकेया, आकाश माधवाल, त्रिस्तान स्तब्स, रमणदीप सिंग, कॅमेरून ग्रीन, झाय रिचर्डसन, राघव गोयल, संदीप वॉरियर्स.
IPL २०२३ साठी मुंबई इंडियन्सचे वेळापत्रक -
- २ एप्रिल - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू वि. मुंबई इंडियन्स, बंगळुरू - सायंकाळी ७.३० वा. पासून
- ८ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. चेन्नई सुपर किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा. पासून
- ११ एप्रिल - दिल्ली कॅपिटल्स वि. मुंबई इंडियन्स, दिल्ली - सायंकाळी ७.३० वा. पासून
- १६ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. कोलकाता नाइट रायडर्स, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
- १८ एप्रिल - स नरायझर्स हैदराबाद वि. मुंबई इंडियन्स, हैदराबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २२ एप्रिल - मुंबई इंडियन्स वि. पंजाब किंग्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २५ एप्रिल- गुजरात टायटन्स वि. मुंबई इंडियन्स, अहमदाबाद - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ३० एप्रिल- मुंबई इंडियन्स वि. राजस्थान रॉयल्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ३ मे - पंजाब किंग्स वि. मुंबई इंडियन्स, मोहाली - सायंकाळी ७.३० वा.पासून
- ६ मे - चेन्नई सुपर किंग्स वि. मुंबई इंडियन्स, चेन्नई - दुपारी ३.३० वा. पासून
- ९ मे - मुंबई इंडियन्स वि. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- १२ मे - मुंबई इंडियन्स वि. गुजरात टायटन्स, मुंबई - सायंकाळी ७.३० वा.पासून
- १६ मे - लखनौ सुपर जायंट्स वि. मुंबई इंडियन्स लखनौ, - सायंकाळी ७.३० वा.पासून
- २१ मे - मुंबई इंडियन्स वि. सनरायझर्स हैदराबाद, मुंबई - दुपारी ३.३० वा.पासून
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: Fans trolled Jasprit Bumrah for not playing IPL 2023 after he appeared at Nita Ambani's event with wife Sanjana Ganesan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.