Cheteshwar Pujara : द्विशतक, शतक अन् पुन्हा शतक!; चेतेश्वर पुजारा सूसाट सुटलाय; टीम इंडियाच्या कसोटी संघात दावा ठोकलाय, Video 

Double hundred, Hundred and Hundred... - खराब फॉर्मामुळे भारताच्या कसोटी संघातून स्थान गमावणाऱ्या चेतेश्वर पुजाराची (  Cheteshwar Pujara ) बॅट कौंटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपलेली पाहायला मिळतेय.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2022 09:45 PM2022-04-29T21:45:50+5:302022-04-29T21:46:26+5:30

whatsapp join usJoin us
Fantastic Cheteshwar Pujara continues in County 2022, 2 hundreds and 1 double hundred from 5 innings for Sussex, Watch Video | Cheteshwar Pujara : द्विशतक, शतक अन् पुन्हा शतक!; चेतेश्वर पुजारा सूसाट सुटलाय; टीम इंडियाच्या कसोटी संघात दावा ठोकलाय, Video 

Cheteshwar Pujara : द्विशतक, शतक अन् पुन्हा शतक!; चेतेश्वर पुजारा सूसाट सुटलाय; टीम इंडियाच्या कसोटी संघात दावा ठोकलाय, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Double hundred, Hundred and Hundred... - खराब फॉर्मामुळे भारताच्या कसोटी संघातून स्थान गमावणाऱ्या चेतेश्वर पुजाराची (  Cheteshwar Pujara scoring and scoring in county 2022) बॅट कौंटी क्रिकेटमध्ये चांगलीच तळपलेली पाहायला मिळतेय. ससेक्स क्लबकडून ( Sussex ) खेळणाऱ्या पुजाराने आज पुन्हा शतकी खेळी करून संघाचा डाव सावरला. कौंटी स्पर्धेतील पहिल्या सामन्यात द्विशतक ( २०१* वि. डर्बीशायर), दुसऱ्या सामन्यात शतक ( १०९ वि. वॉर्करशायर) झळकावल्यानंतर पुजाराने आज डरहॅम ( DURHAM  ) विरुद्ध शतक झळकावले. 

डरहॅमचा पहिला डाव २२३ धावांवर गुंडाळल्यानंतर ससेक्सचा संघ मैदानावर उतरला. पण, सलामीवीर अली ओर ( २७) व मॅसोन क्रेन ( १३) हे माघारी परतल्यानंतर कर्णधार टॉम हैनेस ( ५४) व टॉम अल्सोप ( ६६) यांनी डाव सावरला. ही दोघंही माघारी परतल्यानंतर पुजारा नांगर रोवून उभा राहिला. त्याला टॉम क्लार्कची ( ५०) सुरेख साथ मिळाली. पुजाराने १८९ चेंडूंत १५ चौकारांसह नाबाद १२१ धावा करताना ससेक्सला ५ बाद ३५० धावांपर्यंत मजल मारून दिली आहे. ससेक्सने १२७ धावांची आघाडी घेतली आहे. 

Web Title: Fantastic Cheteshwar Pujara continues in County 2022, 2 hundreds and 1 double hundred from 5 innings for Sussex, Watch Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.