महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) यानं पोस्ट केलेल्या #IndiaTogether & #IndiaAgainstPropaganda या ट्विटनंतर नेटिझन्स चांगलेच खवळले आहेत. ३ फेब्रुवारीला सचिननं हे ट्विट केलं आणि ते ८५ लाख जणांनी रिट्विट केलं, तर २०.७ K लोकांनी त्यावर कमेंट्स केल्या. सोशल मीडियावर जणू सचिनविरोधी वातावरण झाले होते. त्यात मराठमोळा दिग्दर्शन समीर विध्वंस ( Sameer Vidwans) यांनीही सचिनच्या ट्विटवर नाराजी प्रकट करताना परखड मत मांडले.
काय म्हणाले समीर विध्वंस?
"सचिनची बॅटींग बघत लहानाचा मोठा झालो! तो माझ्यासाठी क्रिकेटचा देव होता! आयुष्यात अनेक निराश क्षणी मी त्याच्या इनिंग्ज बघायचो, खूप बरं वाटायचं. त्याच्या अनेक गोष्टी मनाला पटल्या नाहीत पण हे कधी बदललं नव्हतं. पण आता मात्र इथून पुढे सगळं वेगळं असेल. राग येतोचे पण वाईट जास्त वाटतंय!" असं ट्विट समीर विध्वंस यांनी केलं आहे. सचिन तेंडुलकरला आम्ही ओळखलंच नाही!; नेटिझन्सनी मागितली मारिया शारोपोव्हाची माफी
टीकाकारांनीही विध्वंस यांनी सुनावलं...या ट्विटनंतर समीर विध्वंस यांच्यावर टीका होऊ लागली. त्यांनाही त्यांनी उत्तर दिले. त्यांनी लिहिलं की,"मी सभ्य भाषेत माझी मतं मांडतो. सभ्य भाषेतच मांडत राहणार! तरीही त्यावर अर्वाच्य भाषेत अंगावर धाऊन येतात लोक. म्हणून रिप्लाय बंद करावे लागतात. माझ्या मतांशी सहमत नका होऊ, आग्रह नाहीचे. पण सभ्यता का सोडता?! मग अश्यांना ब्लॉक करावं लागतं. आणि ते मी करणार! सभ्यपणे मतमतांतरं असूदेत की!" जॉर्ज फ्लॉइडची अमेरिकेत हत्या झाली तेव्हा भारतीयांनीही दुःख व्यक्त केले; इरफान पठाणचा 'यॉर्कर'
सचिन तेंडुलकरचं ट्विट काय होतं?
आंतरराष्ट्रीय पॉप स्टार रिहाना ( Rihanna) हिनं शेतकरी आंदोलनाबाबद ट्विट केल्यानंतर तिला भारतीयांच्या रोषाचा सामना करावा लागला. सचिननं केलेलं ट्विट हे रिहानाला अप्रत्यक्ष सुनावणारे होते. ''भारताच्या सार्वभौत्मासंदर्भात कसल्याही प्रकराची तडजोड केली जाऊ शकत नाही. भारताच्या अंतर्गत बाबतीत बाहेरील शक्ती केवळ प्रेक्षक असू शकतात, ते याचा भाग होऊ शकत नाहीत. भारतातील नागरिक भारताला चांगले ओळखतात, यामुळे त्यांनीच भारतासंदर्भात निर्णय घ्यायला हवेत. देश एकसंध रहायला हवा,''असं ट्विट सचिननं केलं होतं. भारतीय क्रिकेटपटूंची अवस्था, धोबी का कुत्ता ना घर का ना घाट का!; कंगना राणौतची जहरी टीका
कोण आहेत समीर विध्वंस?समीर विध्वंस यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आनंदी गोपाळ हा चित्रपट बनवण्याचं शिवधनुष्य पेललं ते दिग्दर्शक. समीर विध्वंस सिनेमाला मिळालेल्या पसंतीमुळे सर्वच स्थरावरून कौतुक होत आहे.