ठळक मुद्देवेगवान गोलंदाज भारताला टेस्टमध्ये बेस्ट बनवतील असं मत भारताच्या एका गोलंदाजाने व्यक्त केले आहे.
लंडन : भारतामध्ये दर्जेदार वेगवान गोलंदाज होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारतीय संघापुढे 8-9 वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. यापैकी काही वेगवान गोलंदाजांना इंग्लंडविरुद्धच्या कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे. हेच वेगवान गोलंदाज भारताला टेस्टमध्ये बेस्ट बनवतील असं मत भारताच्या एका गोलंदाजाने व्यक्त केले आहे.
भारतीय कसोटी संघात सध्या मोहम्मद शामी, जसप्रीत बुमरा, इशांत शर्मा, शार्दुल ठाकूर, उमेश यादव या वेगवान गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. भुवनेश्वर कुमारला पाठिच्या दुखण्यामुळे संघात स्थान देण्यात आलेले नाही. भारताच्या वेगवान गोलंदाजीमध्ये चांगले वैविध्य असल्याचे हा संघ पाहिल्यावर दिसत आहे.
याबाबत इशांत शर्मा म्हणाला की, " भारतात वेगवान गोलंदाज तयार होऊ शकत नाहीत, असे काही वर्षांपूर्वी म्हटले जायचे. पण सध्याच्या घडीला भारताकडे वेगवान गोलंदाजांचा ताफा आहे. प्रत्येकाला पर्याय उपलब्ध आहेत आणि संघातील वेगवान गोलंदाजांमध्ये निकोप स्पर्धा आहे. त्यामुळे मला असे वाटते की, वेगवान गोलंदाज भारताला टेस्टमध्ये बेस्ट बनवतील. "
Web Title: 'Fast bowlers make India best in Tests'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.