वेगवान गोलंदाजांना हवी आयपीएलमधून विश्रांती, विराट कोहलीचा प्रस्ताव

विश्वचषकाआधी पुढील वर्षी होणाऱ्या आयपीएलच्या सत्रातून प्रमुख वेगवान गोलंदाजांना विश्रांती देण्याचा प्रस्ताव भारतीय कर्णधार विराट कोहली याने प्राशासकांच्या समितीपुढे(सीओए) ठेवला. मात्र या प्रस्तावाला फ्रान्चायसींकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता नाहीच.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2018 02:54 AM2018-11-09T02:54:25+5:302018-11-09T02:56:15+5:30

whatsapp join usJoin us
Fast bowlers want relaxation from IPL -Virat Kohli | वेगवान गोलंदाजांना हवी आयपीएलमधून विश्रांती, विराट कोहलीचा प्रस्ताव

वेगवान गोलंदाजांना हवी आयपीएलमधून विश्रांती, विराट कोहलीचा प्रस्ताव

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली -
हैदराबाद येथे अलीकडेच सीओएसोबत कोहलीची बैठक झाली. बैठकीदरम्यान कोहलीने जसप्रीत बुमराह आणि भुवनेश्वरसारख्यांना आयपीएलपासून विश्रांती देण्याचा प्रस्ताव ठेवला. या दोघांना विश्वचषकासाठी ताजेतवाने ठेवण्याची योजना यामागे आहे. कोहलीच्या या प्रस्तावाचे कुणी समर्थन केले नाही. बोर्डाच्या पदाधिकाºयांनी यावर फ्रॅन्चायसी सहमत होणार नाही, असे उत्तर दिले.
कोहलीने हा प्रस्ताव ठेल्यानंतर सीओए प्रमुख विनोद राय यांनी रोहितचे मत जाणून घेतले. रोहित म्हणाला,‘मुंबई इंडियन्स प्ले आॅफमध्ये पोहोचला अािण बुमराह फिट असेल तर मी त्याला विश्रांती देऊ शकणार नाही.’
भारतीय कर्णधाराने वेगवान गोलंदाजांना संपूर्ण आयपीएलमधून विश्रांती देण्याची योजना कशी काय बोलून दाखविली, यावर बैठकीला उपस्थित एका अन्य अधिकाºयाने आश्चर्य व्यक्त केले. हा अधिकारी पुढे म्हणाला,‘मागील काही वर्षांपासून आयपीएल ट्रेनर तसेच फिजिओ खेळाडूंच्या व्यस्त वेळापत्रकावर लक्ष ठेवून भारतीय संघाच्या सहयोगी स्टाफसोबत समन्वय राखून आहेत. पुढीलवर्षी देखील हेच धोरण राहील. वेगवान गोलंदाज सर्वच सामने खेळत नाहीत. विराटचे लक्ष केवळ भुवी आणि बुमराह यांच्यावर आहे, कारण मोहम्मद शमी, उमेश यादव आणि खलील हे आपपाल्या संघाची स्वाभाविक पसंती नसतात. सर्वच सामन्यात या तिघांना संधी दिली जात नाही. दोन प्रमुख गोलंदाजांना आयपीएलमधून विश्रांती हवी, अशी विराटची इच्छा आहे. याचा या दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीवर विपरीत परिणाम देखील होऊ शकेल. विश्वचषकाच्या दोन महिन्यांआधीपासून सराव सामन्यांस त्यांना मुकावे लागू शकते.’(वृत्तसंस्था)

रोहितही असहमत...

बैठकीला उपस्थित एका ज्येष्ठ अधिकाºयाने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार,‘आयपीएलचे सत्र २९ मार्च रोजी सुरू होईल आणि १९ मे रोजी संपणार आहे.’ विश्वचषकात भारताला पहिला सामना ५ जून रोजी द. आफ्रिकेविरुद्ध खेळावा लागेल. हे अंतर १५ दिवसांचे असेल. त्यामुळे वेगवान गोलंदाजांना विश्रांतीची शक्यता कमीच आहे. या बैठकीला उपस्थित वन डे संघाचा कर्णधार रोहित शर्मा हा देखील कोहलीच्या मताशी सहमत नव्हता.

Web Title: Fast bowlers want relaxation from IPL -Virat Kohli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.