मुंबई : ‘वेगवान खेळपट्ट्यांमुळे चेंडू आणि बॅटदरम्यान बरोबरीची लढत रंगते. यामुळे भारताला वेगवान गोलंदाज घडविण्यास मदतही मिळेल. त्यामुळे भारतामध्ये जास्तीतजास्त वेगवान गोलंदाजीसाठी पोषक ठरणाऱ्या खेळपट्ट्या तयार झाल्या पाहिजेत,’ असे मत आॅस्टेÑलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट ली याने व्यक्त केले.
क्रिकेट क्लब आॅफ इंडिया (सीसीआय) येथे झालेल्या एका कार्यक्रमादरम्यान ब्रेट लीने, ‘आगामी विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ चांगले प्रदर्शन करेल,’ असे भाकीतही वर्तविले. वेगवान गोलंदाजांविषयी ली याने म्हटले की, ‘वेगवान गोलंदाजांना फायदा होईल अशी खेळपट्टी बनविण्यासाठी मी मैदान कर्मचाऱ्यांना आवाहन करेन. खेळपट्टीवर काही प्रमाणात गवत असले पाहिजे, जेणेकरून वेगवान गोलंदाजांना अधिक फायदा मिळेल. थोड्या प्रमाणात गवत असले, तर सामना बरोबरीचा रंगेल.
त्याचवेळी ली याने जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध क्रिष्णा आणि नवदीप सैनी यांचेही कौतुक केले. त्याने म्हटले की, ‘भारताकडे शानदार गोलंदाज आहेत. जसप्रीत बुमराह अप्रतिम आहे. त्याच्याकडे वेग असून आगळीवेगळी शैलीही आहे. प्रसिद्ध क्रिष्णा आयपीएलमध्ये १४५ किमी वेगाने सातत्याने मारा करत आहे. नवदीप सैनीकडेही मोठी गुणवत्ता आहे. भारताच्या सध्याच्या वेगवान गोलंदाजांकडे चांगला वेग आहे.’
Web Title: Fast pitch needs in India - Brett Le
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.