वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

सुरेश रैनाच्या या माघारीनंतर अनेक अंदाज बांधले गेले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2020 04:46 PM2020-09-02T16:46:17+5:302020-09-02T16:48:09+5:30

whatsapp join usJoin us
'A father can scold his son' - Suresh Raina reacts to CSK owner N Srinivasan's comments on him | वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

वडिलांना मुलावर रागावण्याचा अधिकार; एन श्रीनिवासन यांच्या विधानावर सुरेश रैनाची प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे29 ऑगस्टला सुरेश रैनानं आयपीएलमधून माघार घेतल्याचं संघाला कळवलंत्याच्या या माघारीमागे अनेक तर्क लावले गेले, त्यात धोनीसोबतचा वाद हाही मुद्दा होताचार दिवसांनंतर सुरेश रैनानं खरं कारण सांगताना, सर्व चर्चांवर स्पष्ट मत मांडलं

इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल) 13व्या मोसमातून सुरेश रैनानं माघार घेतल्यानं चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्काच बसला. रैनानं वैयक्तिक कारण सांगून दुबईतून मायदेशात परतला. CSK संघाचे मालक एन श्रीनिवासन यांनीही रैनाच्या निर्णयावर नाराजी व्यक्त करताना त्याला खडेबोल सुनावले होते. अर्थात त्यांनी त्या विधानावरून नंतर माघार घेत, रैना CSK कुटुंबाचा सदस्य असल्याचे सांगितले. पण, रैनानं मंगळवारी या सर्व मुद्द्यांवर सडेतोड मत मांडलं. 

CPL 2020 : 27 धावांत 8 फलंदाज माघारी परतले; अफगाणिस्तानच्या गोलंदाजानं कमालच केली

''तो कॉमेडियन प्राईमा डोन्नास, सारखा वागत आहे. चेन्नई सुपर किंग्स हे एक कुटुंब आहे आणि संघातील वरिष्ठ खेळाडूंनी याची जाण असायला हवी. तुम्ही नाखूष असाल, तर खुशाल जा. मी जबरदस्ती करणार नाही. काहीवेळा यश डोक्यात जाते,''असे श्रीनिवास म्हणाले होते. या विधानावरून त्यांच्यावर नेटिझन्सनी जोरदार टीका केली. 

त्यानंतर CSKनं एक ट्विट केलं आणि त्यात श्रीनिवासन यांनी लिहिलं की,''रैना हा आमच्या CSK कुटुंबाचा सदस्य आहे. मागील दहा वर्षांपासून तो आमच्यासोबत आहे. फ्रँचायझी त्याच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे आणि या कठीण काळात आमचा त्याला पूर्ण पाठींबा आहे.''  


आज रैनाने त्या विधानावर प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,''ते माझ्या वडीलांसारखे आहेत आणि ते माझ्या पाठीशी खंबीरपणे नेहमी उभे राहिले आहेत. त्याचं स्थान माझ्या हृदयानजीक आहे. ते मला मोठ्या मुलासारखेच वागवायचे आणि मला खात्री आहे, त्यांच्या विधानाचा विपर्यास केला गेला असावा. एक बाप अपने बच्चे को दाट सकता है ( वडील आपल्या मुलांना फटकारू शकतात).''  

श्रीनिवासन यांना माहीत नव्हतं...
मी दुबई सोडण्यामागचं कारण त्यांना माहीत नव्हतं आणि त्यामुळे त्यांनी तशी प्रतिक्रिया दिली असावी. आता त्यांना कारण सांगण्यात आलं आहे आणि त्यानंतर त्यांनी मला मॅसेजही पाठवला. आम्ही चर्चा केली आणि मला या संकटातून लवकर बाहेर पडायचे आहे, असेही रैनानं सांगितलं.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; आणखी 20 क्रीडा प्रकारातील खेळाडूंना मिळणार सरकारी नोकरी

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीसोबत झाला वाद? मायदेशी परतलेल्या सुरेश रैनानं मौन सोडलं

29 ऑगस्टला नेमकं काय घडलं?

चेन्नई सुपर किंग्सनं 29 ऑगस्टला ट्विटवर पोस्ट करून माहिती दिली होती. ''सुरेश रैनानं वैयक्तिक कारणास्तव भारतात परतण्याचा निर्णय घेतला आहे आणि तो आयपीएलच्या यंदाच्या मोसमात खेळणार नाही. रैना आणि त्याच्या कुटुंबीयांना चेन्नई सुपर किंग्सचा पूर्ण पाठींबा आहे,''असे मुख्य कार्यकारी अधिकारी केएस विश्वनाथन यांनी सांगितले होते. 

Web Title: 'A father can scold his son' - Suresh Raina reacts to CSK owner N Srinivasan's comments on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.