मुंबई : बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर झाला आहे. या संघात एका खेळाडूला स्थान देण्यात आले आहे. या खेळाडूची एक गोष्ट आता पुढे आली आहे. या खेळाडूला लहानपणी प्रॅक्टीस दिली होती ती त्याच्या वडिलांनीच. कारण या खेळाडूने प्रत्येक दिवशी पाचशे चेंडूंची ते प्रॅक्टीस द्यायचे. त्यामुळे आता आपल्या मुलावर घेतलेली मेहनत फळाला आल्याचे भाव त्यांच्या चेहऱ्यावर आहेत. आता हा खेळाडू कोण, याची उत्सुकता तुम्हाला असेल...
तो चार वर्षांचा होता. तेव्हा त्याच्यातील गुणवत्ता त्यांच्या घरातील एका नोकराने ओळखली. त्याने या खेळाडूच्या वडिलांना सांगितले की, तुमच्या मुलामध्ये चांगली गुणवत्ता आहे. त्यानंतर या खेळाडूंच्या वडिलांनी ही गोष्ट मनावर घेतली आणि त्यांनी त्याला प्रॅक्टीस द्यायला सुरुवात केली. आता बांगलादेशविरुद्धच्या ट्वेन्टी-20 संघात त्याने एंट्री केली आहे. हा खेळाडू आहे मुंबईचा शिवम दुबे.
सौरव गांगुलीनं टीम इंडियाचं नेतृत्व सोपवलं रोहित शर्माकडे
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील कसोटी मालिका यजमानांनी 3-0 अशी जिंकली. या मालिकेनंतर भारतीय संघ बांगलादेशचा सामना करणार आहे. बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी आज टीम इंडियाची निवड केली गेली. या बैठकीला बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष सौरव गांगुली, निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद आणि कर्णधार विराट कोहली उपस्थित होते. ट्वेंटी-20 साठी जाहीर केलेल्या टीम इंडियाचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपवण्यात आले आहे.
भारतीय संघ ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीच्या दृष्टीनं विचार करत आहे. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी सर्वोत्तम संघ निवडण्याची प्रक्रिया आतापासूनच सुरु झाली आहे. त्यामुळे अधिकाधिक युवा खेळाडूंना संधी देऊन त्याची चाचपणी केली जाणार आहे. त्यात संघातील वरिष्ठ खेळाडूंवर पडणारा ताणही लक्षात घेतला जाणार आहे. म्हणूनच बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्याचा विचार भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) करत होते. त्यामुळे या मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे.
भारताचा ट्वेंटी-20 संघ - रोहित शर्मा ( कर्णधार), लोकेश राहुल, शिखर धवन, संजू सॅमसन, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत ( यष्टिरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, युजवेंद्र चहल, राहुल चहर, दीपक चहर, खलील अहमद, शिवम दुबे, शार्दूल ठाकूर
बांगलादेशचा ट्वेंटी-20 संघ - शकिब अल हसन ( कर्णधार), तमीम इक्बाल, लिटन दास, सौम्या सरकार, नैम शेख, मुश्फीकर रहीम, महमुदुल्लाह, अफीफ होसैन, मोसादेक होसैन, अनिमुल इस्लाम, अराफत सन्नी, मोहम्मद सैफुद्दीन, अल-अमीन होसैन, मुस्ताफिजूर रहमान, सफीऊल इस्लाम.
मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक
3 नोव्हेंबर - पहिली ट्वेंटी-20, दिल्ली
7 नोव्हेंबर- दुसरी ट्वेंटी-20, राजकोट
10 नोव्हेंबर- तिसरी ट्वेंटी-20, नागपूर
कसोटीत विराट कोहली खेळणार
दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठीच्या संघात विराट कोहलीकडे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. हा संघ - विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, वृद्धीमान साहा ( यष्टिरक्षक), रवींद्र जडेजा, आर अश्विन, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, शुबमन गिल, रिषभ पंत.
Web Title: Father throws 500 balls daily to practice; he is now in Team India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.