Join us

विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo

Happy Birthday Virat Kohli, Photo with two kids: विराट कोहलीचा आज वाढदिवस असून तो ३६ वर्षांचा झाला. त्याच्यावर पत्नी अनुष्का शर्मासह सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2024 14:47 IST

Open in App

Happy Birthday Virat Kohli, Photo with two kids: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहली लंडनला स्थायिक होणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्यात. यामागचे कारण नॅशनल ड्युटी आटोपली (भारतीय संघाकडून खेळले जाणारे  क्रिकेट सामने) की, तो पत्नी अनुष्का शर्मा ( Anushka Sharma )  सोबत लंडनमध्ये वास्त्यव्याला पसंती देताना दिसला. पण किंग कोहलीने आपल्या ३६ व्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन पत्नी अनुष्का, मुलगी वामिका ( Vamika ) आणि मुलगा अकाय (Akaay ) यांच्यासोबत भारतातच केल्याचे दिसले. याचदरम्यान अनुष्काने विराटचा एक खास फोटो पोस्ट केला. यात विराट दोन लेकरांसोबत खूपच क्यूट दिसतोय. 

विराट बाबा 'ऑन ड्यूटी'...

भारतीय संघाचा धडाकेबाज फलंदाज हा मैदानात अतिशय आक्रमक असतो. पण वैयक्तिक आयुष्यात मात्र तो 'फॅमिली मॅन' आहे. क्रिकेट मालिका नसताना विराट त्याची पत्नी अनुष्का आणि मुलं वामिका अन् अकाय यांच्यासोबत वेळ घालवताना दिसतो. अनुष्काने आज विराटच्या वाढदिवसानिमित्त एक खास फोटो पोस्ट केला आहे. या फोटो विराट वडिलांच्या भूमिकेत असून आपले कर्तव्य पार पाडतोय. अनुष्का शर्माने पोस्ट केलेल्या फोटोत विराट एका हातात वामिका आणि दुसऱ्या हातात अकाय असे दोघांना कडेवर घेऊन चालताना दिसतोय.

बर्थडे दिवशी विराट कोहलीची खास झलक; अनुष्कासोबत फोटोसाठीही दिली पोज

भारतीय संघाने नुकतीच घरच्या मैदानावर न्यूझीलंड विरुद्ध कसोटी मालिका खेळली. या मालिकेत विराट कोहलीही टीम इंडियाचा भाग होता. या मालिकेत ना कोहली चालला ना टीम इंडियाचा जलवा दिसला. पण याचा कोहलीच्या मूडवर फारसा नकारात्मक परिणाम अजिबात झालेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्याला जाण्याआधी कोहलीचा मूड एकदम फ्रेश दिसतोय. कोहली हा त्याच्या स्वत:च्या मालकीच्या  One8 Commune रेस्टॉरंटमध्ये स्पॉट झाला. यावेळी त्याने अनुष्कासोबत फोटोसाठी पोज देत पापाराझीं गप्पा गोष्टी केल्याचा सीनही पाहायला मिळाला.

 

टॅग्स :विराट कोहलीअनुष्का शर्माइन्स्टाग्रामसोशल व्हायरलसोशल मीडिया