NZ vs PAK : ११ वर्षांनी पाकिस्तानी फलंदाजानं झळकावलं शतक, पण न्यूझीलंडनं दिली पराभवाचा चपराक!

केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला.

By स्वदेश घाणेकर | Published: December 30, 2020 11:09 AM2020-12-30T11:09:48+5:302020-12-30T11:11:54+5:30

whatsapp join usJoin us
Fawad Alam brings up his second Test century after 11 years, But New Zealand wins the first Test match by 101 runs | NZ vs PAK : ११ वर्षांनी पाकिस्तानी फलंदाजानं झळकावलं शतक, पण न्यूझीलंडनं दिली पराभवाचा चपराक!

NZ vs PAK : ११ वर्षांनी पाकिस्तानी फलंदाजानं झळकावलं शतक, पण न्यूझीलंडनं दिली पराभवाचा चपराक!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

न्यूझीलंडविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात फवाद आलम ( Fawad Alam) याच्या शतकानं पाकिस्तानच्या विजयाच्या आशा जीवंत केल्या. त्याला कर्णधार मोहम्मद रिझवान याच्य अर्धशतकाची साथ मिळाल्यानं त्या आशा आणखी पल्लवीत झाल्या होत्या. फवादनं कसोटीतील दुसरं आणि २००९नंतर पहिलं शतक झळकावले, परंतु न्यूझीलंडनं सामन्यात कमबॅक केलं. न्यूझीलंडनं पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. 

केन विलियम्सनच्या ( १२९) शतकाच्या आणि रॉस टेलर ( ७०), हेन्री निकोल्स ( ५६) व बी जे वॉटलिंग ( ७३) यांच्या अर्धशतकांच्या जोरावर न्यूझीलंडनं पहिल्या डावात ४३१ धावांचा डोंगर उभा केला. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव २३९ धावांवर गडगडला. न्यूझीलंडनं दुसरा डाव ५ बाद १८० धावांवर घोषित करून पाकिस्तानसमोर ३७३ धावांचे लक्ष्य ठेवले.  फॅन्सच्या मजेशीर फलकांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे. खेळाडूंकडून झालेल्या चुकांचा पाढाच या फॅननं सर्वांसमोर मांडून पाकिस्तानी संघाचे जाहीर वाभाडे काढले. गचाळ क्षेत्ररक्षण, झेल सोडणे याचा हिशेबच चाहत्यानं मांडला आणि कॅमेरामननं तो टिपून जगजाहीर केला.

न्यूझीलंडनं ठेवलेल्या ३७३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या पाकिस्ताननं ३ बाद ७१ धावांवरून पाचव्या दिवसाची सुरुवात केली. अझर अली आणि फवाद यांनी पाचव्या दिवसाच्या खेळाची सुरुवात केली. ट्रेंट बोल्टनं पाकिस्तानला चौथा धक्का दिला. त्यानं अझर अलीला ( ३८ ) बाद केले. फवाद आणि मोहम्मद रिझवान यांनी पाचव्या विकेटसाठी १६५ धावांची भागीदारी करून पाकिस्तानच्या विजयाच्या आशा पल्लवीत केल्या. कायले जेमिन्सननं पाकिस्तानचा कर्णधार रिझवानला पायचीत केले. रिझवान १९१ चेंडूंत ६० धावांवर माघारी परतला.

 

त्यापाठोपाठ नील वॅगनरनं एक जबरदस्त धक्का दिला. फवाद २६९ चेंडूंत १४ चौकारांसह १०२ धावांवर माघारी परतला. फहीम अश्रफ ( १९), यासीर शाह ( ०) आणि मोहम्मद अब्बास ( १) यांना बाद करून न्यूझीलंडनं कमबॅक केले. पाकिस्तानच्या अखेरच्या विकेटनं किवी गोलंदाजांना झुंजवलं. पण, दिवस संपायला चार षटकं शिल्लक असताना पाकिस्तानची अखेरची विकेट पडली. पाकिस्ताचा संपूर्ण संघ २७१ धावांत तंबूत पाठवून न्यूझीलंडनं १०१ धावांनी सामना जिंकला. 

Web Title: Fawad Alam brings up his second Test century after 11 years, But New Zealand wins the first Test match by 101 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.