१४०००+ धावा करणारा फलंदाज १४ वर्षांत योग्य संधी न मिळाल्याने पाकिस्तान सोडून अमेरिकेत निघाला 

२०१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४५२६ धावा केल्या आणि त्याची सरासरी ही ५५.६५ इतकी राहिली ाहे. त्याने ४३ शतकं व ७० अर्धशतकं झळकावली आहे.  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 04:54 PM2023-08-08T16:54:23+5:302023-08-08T16:54:46+5:30

whatsapp join usJoin us
Fawad Alam has decided to quit Pakistan cricket to get opportunities in the USA | १४०००+ धावा करणारा फलंदाज १४ वर्षांत योग्य संधी न मिळाल्याने पाकिस्तान सोडून अमेरिकेत निघाला 

१४०००+ धावा करणारा फलंदाज १४ वर्षांत योग्य संधी न मिळाल्याने पाकिस्तान सोडून अमेरिकेत निघाला 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अमेरिकेत करिअर करण्यासाठी फवाद आलम ( Fawad Alam) ने पाकिस्तान क्रिकेट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. डावखुऱ्या फलंदाजाने राष्ट्रीय संघ निवडीसाठी सतत वंचित राहिल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. ३६ वर्षीय अनुभवी फवाद आता 'स्थानिक खेळाडू' म्हणून मायनर लीग क्रिकेट T20 मध्ये शिकागो किंग्समनकडून खेळेल.


१६ वर्षांपूर्वी २००७ मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर फवाद आलमने तिन्ही फॉरमॅटमध्ये पाकिस्तानचे प्रतिनिधित्व केले. सुमारे दीड दशकाहून अधिक काळ संघात असूनही फवादने पाकिस्तानसाठी फक्त ८१ आंतरराष्ट्रीय सामने खेळले. ३६ वर्षीय खेळाडू राष्ट्रीय संघात नियमितपणे आपले स्थान पक्के करू शकला नाही. देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे फळ त्याला कधी मिळाले नाही.

 


फवाद आलमने १९ कसोटी सामन्यांत ३८.८८ च्या सरासरीने १९११ धावा केल्या.  या अनुभवी फलंदाजाने पाकिस्तानसाठी कसोटी क्रिकेटमध्ये दोन अर्धशतके आणि पाच शतके नोंदवली. वन डे क्रिकेटमध्ये त्याने ३८ सामन्यांत ४०.२५च्या सरासरीने व ७४.४७च्या स्ट्राईक रेटने ९६६ धावा केल्या. त्याने १ शतक व सहा अर्धशतकं झळकावली. ट्वेंटी-२०त त्याने १७ इनिंग्जमध्ये १९४ धावा केल्या. २००९च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप विजेत्या संघाचा तो सदस्य होता.  

२००९मध्ये फवादनं अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर मागच्या वर्षी त्याने पाकिस्तान संघात पुनरागमन केलं. त्यानंतर त्यानं चार शतकं झळकावली. विशेष म्हणजे त्यानं ही पाचही शतकं वेगवेगळ्या देशांत झळकावली आहेत. २००९मध्ये त्यानं श्रीलंकेविरुद्ध १६८ धावा केल्या होत्या. त्यानंतर पुढील चार शतकं ही न्यूझीलंड, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिज संघांविरुद्ध झळकावली होती.  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद पाच शतकं झळकावणारा तो आशियातील अव्वल फलंदाज ठरला आहे. त्यानं भारताच्या चेतेश्वर पुजाराचा विक्रम मोडला. पुजारानं २४ डावांमध्ये पाच शतकं झळकावली होती, आलमनं २२ डावांत हा पराक्रम केला. सौरव गांगुली आणि सुनील गावस्कर यांना २५ डावांत हा पराक्रम करता आला होता.


स्थानिक क्रिकेटमध्ये त्याने २०१ प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १४५२६ धावा केल्या आणि त्याची सरासरी ही ५५.६५ इतकी राहिली ाहे. त्याने ४३ शतकं व ७० अर्धशतकं झळकावली आहे.  
 

 

Web Title: Fawad Alam has decided to quit Pakistan cricket to get opportunities in the USA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.