England vs Pakistan, 3rd Test: 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून कसोटीत पदार्पण अन् आज घेतली पहिली विकेट

England vs Pakistan, 3rd Test: इंग्लंडनं दुसऱ्या दिवशी 147 षटकांक 6 बाद 539 धावा चोपल्या होत्या.   

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 10:27 PM2020-08-22T22:27:29+5:302020-08-22T22:28:02+5:30

whatsapp join usJoin us
Fawad Alam made his Test debut 11 years, 1 month and 11 days ago; Jos Buttler was his first Test wicket   | England vs Pakistan, 3rd Test: 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून कसोटीत पदार्पण अन् आज घेतली पहिली विकेट

England vs Pakistan, 3rd Test: 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानकडून कसोटीत पदार्पण अन् आज घेतली पहिली विकेट

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

England vs Pakistan, 3rd Test: मालिकेत 1-0 अशा आघाडीवर असलेल्या इंग्लंड संघानं तिसऱ्या व शेवटच्या कसोटीत पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई केली. रोरी बर्न्स आणि डॉम सिब्ली हे सलामीवीर माघारी परतल्यानंतर झॅक क्रॅवली आणि जोस बटलर यांनी पाकिस्तानी गोलंदाजांची पिसे उपटली. या दोघांनी पाचव्या विकेटसाठी तीनशेहून अधिक धावांची भागीदारी केली. पहिल्या दिवसाचा खेळ गाजवल्यानंतर झॅकने दुसऱ्या दिवशी द्विशतक पूर्ण केलं. 267 धावांवर त्याला बाद करण्यात पाकिस्तानी गोलंदाजांना यस मिळालं. पण, बटलरनं दुसऱ्या बाजूनं फटकेबाजी कायम ठेवली. त्यानं 152 धावा चोपल्या.

होऊन जाऊ दे; निरोपाचा सामना न खेळलेले खेळाडू विरुद्ध टीम इंडिया; इरफान पठाणची भन्नाट कल्पना

92 वर्षांत इंग्लंडच्या कोणत्याच फलंदाजाला न जमलेला विक्रम झॅक क्रॅवलीनं केला!

शाब्बास झॅक; इंग्लंडच्या 22 वर्षीय फलंदाजानं मोडला 82 वर्षांपूर्वीचा विक्रम 

कर्णधार जो रूट ( 29) आणि ओली पोप ( 3) यांनाही छाप पाडता आली नाही. झॅक आणि बटलर यांनी इंग्लंडचा डाव सावरला.  बटलरच्या शतकानंतर झॅक अॅक्शन मोडमध्ये आला. त्यानं 335 चेंडूंत द्विशतक पूर्ण केलं. त्यात 26 चौकारांचा समावेश आहे. इंग्लंडकडून द्विशतक झळकावणारा तो तिसरा युवा फलंदाज ठरला. त्यानं 22 वर्ष  201 दिवसांत ही कामगिरी केली. यासह त्यानं 1938/39 साली बिल एडरीच यांचा ( 22 वर्ष व 352 दिवस)  विक्रम मोडला. या विक्रमात पहिल्या दोन स्थानी लेन हटन ( 22 वर्ष व 60 दिवस) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध 1938मध्ये 364 धावा, तर डेव्हीड गोवर ( 22 वर्ष व 103 दिवस ) यांनी भारताविरुद्ध 1979मध्ये नाबाद 200 केल्या होत्या.  या सामन्यापूर्वी झॅकनं 11 कसोटी डावांत 314 धावा केल्या होत्या आणि आज त्यानं पाकिस्तानविरुद्ध 250 धावांचा पल्ला पार केला.  


इंग्लंडकडून पहिले कसोटी शतक झळकावताना झॅकनं 92 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. त्यानं 393 चेंडूंत 34 चौकार व 1 षटकारासह 267 धावा केल्या. या कामगिरीसह त्यानं वॅली हॅमोंड यांनी 1928साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध नोंदवलेला 251 धावांचा विक्रम मोडला. या विक्रमात अव्वल स्थानी टीम फोस्टर आहेत. त्यांनी 1903साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध 287 धावा केल्या होत्या. त्यापाठोपाठ बटलरनं तुफान फटकेबाजी केली. त्यानं 311 धावांत 13 चौकार व 2 षटकार खेचून 152 धावा केल्या. पाकिस्तानचा फवाद आलमनं त्याला बाद केलं. 11 वर्षांपूर्वी पाकिस्तानच्या कसोटी संघाकडून पदार्पण करणाऱ्या फवादची ही पहिलीच विकेट ठरली. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : RCBच्या खेळाडूंसोबत न जाता विराट कोहलीनं 'प्रायव्हेट' विमानानं घेतली दुबईसाठी भरारी

IPL 2020 : इंग्लंड, ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंसाठी नियमात सूट नाही; CSK, RR, KKR संघांना आलं टेंशन

Good News : लवकरच भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परतणार; सौरव गांगुलीनं दिले मोठे अपडेट्स

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनीचा नम्रपणा; स्वतःची बिझनेस क्लासची सीट दिली इकोनॉमी क्लासमधील प्रवाशाला

Web Title: Fawad Alam made his Test debut 11 years, 1 month and 11 days ago; Jos Buttler was his first Test wicket  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.