ठळक मुद्देगावसकर यांनी २००४ मध्ये आपली सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचे उदाहरण दिले. ‘त्यावेळी मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या जॉन राइट हे थोडे चिंताग्रस्त होते.
नवी दिल्ली : टी-२० विश्वचषकासाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघात माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार आहे. माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी धोनीची नियुक्ती भारतीय संघासाठी आनंदाची बाब असल्याचे सांगितले. त्याचवेळी त्यांनी डावपेच आखण्यावरून रवि शास्त्री आणि धोनीमध्ये वादाची ठिणगी पडू नये, अशी अपेक्षाही व्यक्त केली आहे.
n गावसकर यांनी २००४ मध्ये आपली सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचे उदाहरण दिले. ‘त्यावेळी मुख्य प्रशिक्षक असणाऱ्या जॉन राइट हे थोडे चिंताग्रस्त होते. त्यांना मी त्यांची जागा घेईन असे वाटले होते. पण रवि शास्त्री यांना धोनीला प्रशिक्षणात जास्त रस नसल्याची कल्पना आहे.
n जर दोघांनीही एकत्रपणे काम केले तर संघासाठी खूप उपयुक्त ठरेल, असे गावसकर यांनी म्हटले आहे. ‘धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने २०११चा वन डे विश्वचषक आणि त्याआधी २००७ चा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. भारताला नक्कीच याचा लाभ होईल, असे मत त्यांनी मांडले.
Web Title: Fear of conflict due to Mahendra Singh Dhoni's election: Gavaskar
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.