भारतीय संघातील स्टार बॅटर श्रेयस अय्यर याने टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी आतुर असल्याचे संकेत आपल्या फटकेबाजीतून दिले आहेत. मागील काही दिवसांपासून श्रेयस अय्यर हा नावाला साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरताना दिसला. भारतीय कसोटी संघातून वगळण्यात आल्यानंतर बीसीसीआयच्या वार्षिक करारातूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला.
कमबॅकच्या शर्यतीत अजून कायम, अय्यरनं क्लास खेळीसह दिले संकेत
श्रीलंका दौऱ्यातील वनडे सामन्यातही तो संघाचा भाग होता. या सामन्यातही त्याला चमकदार कामगिरी करून दाखवता आली नव्हती. बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी दावेदारी भक्कम करण्यासाठी दुलिप करंडक स्पर्धा ही त्याच्यासाठी शेवटची संधी होती. पहिला डाव फुसका निघाल्यावर टीम इंडियातून आउट होण्याची टांगती तलवारच त्याच्यावर लटकत होती. पण दुसऱ्या डावात त्याने आपल्या भात्यातील फटकेबाजीनं टीम इंडियातील कमबॅकच्या शर्यतीत आहे, असे संकेत दिले आहेत.
श्रेयस अय्यरनं ३९ चेंडूत साजरे केले अर्धशतक
श्रेयस अय्यर दुलिप करंडक स्पर्धेत भारत 'ड' संघाच नेतृत्व करतोय. भारत 'क' विरुद्धच्या सामन्यातील दुसऱ्या डावात श्रेयस अय्यरने कॅप्टन्सीला साजेसा खेळ करत ३९ चेंडूत अर्धशतक झळकावले.या अर्धशतकी खेळीत त्याने ४२ धावा या ९ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने केल्या. ४० धावांवर संघाच्या दोन विकेट्स पडल्या असताना आक्रमक अंदाजात बॅटिंग करत श्रेयस अय्यरनं संघाला मजबूत स्थितीत आणले.
चेंडूसोबत बॅटही हवेत उडाली, अन् श्रेयस अय्यर परतला तंबूत
श्रेयस अय्यर एक मोठा फटका मारताना अगदी दुर्देवीरित्या बाद झाला. अंकुश कंबोज याच्या चेंडूवर उत्तुंग फटका मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला. बॉलसह बॅटही हवेत उडाली. भारत 'क' संघाच्या ऋतुराज गायकवाड याने कोणतीही चूक न करता त्याचा झेल पकडला. अय्यरला ४४ चेंडूत ५४ धावा करून माघारी फिरावे लागले. पहिल्या डावातील फ्लॉप शोनंतर आउट होण्याची जी धास्ती होती ती थोड्या प्रमाणात का होइना कमी झाली आहे. श्रेयस अय्यरने