इंडियन प्रीमियर लीगमध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) ने गेल्या काही हंगामात संघर्ष केला आहे. आयपीएल २०२३ मध्ये १४ सामन्यांतून फक्त ४ विजय मिळवून ते तळाशी राहिले. एडन मार्करामच्या नेतृत्वाखालील संघ या वर्षी स्पर्धेदरम्यान अन्य संघांच्या तुलनेत कुठेच खरा उतरला नाही. संघात काही मोठी नावे असूनही त्यांच्याकडे फायर पॉवरची कमतरता होती. SRH ने प्रथम डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसन या दोन स्टार खेळाडूंना संघातून रिलीज केले आणि त्यानंतर जॉनी बेअरस्टो आणि रशीद खान यांनाही कायम न ठेवता सतत बदल केले. पण, त्याचा फार फायदा झालेला नाही.
सनरायझर्स हैदराबादच्या प्रत्येक पराभवानंतर सह मालकिण काव्या मारन ( Kavya Maran) हिचा रडवेला चेहला कॅमेरामन टिपत आलाय आणि तो पाहून चाहत्यांनाही दुःख झालेलं सोशल मीडियावर दिसलं. SRH म्हटलं की काव्याची चर्चा ही होतेच. SRH च्या संघ निवडीत ऑक्शनमध्ये तिची उपस्थिती असते, पण संघाची कामगिरी पाहून चाहतेही काव्यासाठी दुःखी होतात. काव्याला अस्वस्थ बसलेले आणि दुःखी पाहून अभिनेता आणि सुपरस्टार रजनीकांत यालाही वाईट वाटतेय.
त्याच्या आगामी 'जेलर' चित्रपटाच्या ऑडिओ लॉन्चच्या वेळी बोलताना त्याने हे दुःख व्यक्त केले. त्याने SRH चे मालक आणि चित्रपटाचे निर्माते कलानिथी मारन यांना एक विनंती केली आहे. रजनीकांत म्हणाले, "कलानिती मारन यांनी सनरायझर्स हैदराबाद संघात चांगले खेळाडू ठेवले पाहिजेत. आयपीएलदरम्यान काव्याला टीव्हीवर असे पाहून मला वाईट वाटते."
'थलैवा' कडून SRH मालकाला केलेली ही विनंती आता इंटरनेटवर व्हायरल झाली आहे, त्याच्या चाहत्यांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत. एका ट्विटर वापरकर्त्याने लिहिले: "काव्याला असे पाहून मलाही वाईट वाटत आहे." आणखी एका यूजरने लिहिले, "रजनी सर आम्हालाही काव्याला असे पाहून वाईट वाटते."