PAK vs AUS T20I : Babar Azam मुळे तरुणाला रहावे लागणार बॅचलर; पूर्ण न झालेल्या डिमांडमुळे गर्लफ्रेंडने दिला नकार

वन डे मालिका विजयानंतर पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० सामना जिंकण्यासाठी मैदानावर उतरला.पण चर्चा पोस्टरची रंगली.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:11 PM2022-04-06T17:11:15+5:302022-04-06T17:11:51+5:30

whatsapp join usJoin us
Feel for this guy: If Pakistan wins, i will say Yes, girl poster goes viral and Australia beat Pakistan by 3 wickets (with 5 balls remaining) | PAK vs AUS T20I : Babar Azam मुळे तरुणाला रहावे लागणार बॅचलर; पूर्ण न झालेल्या डिमांडमुळे गर्लफ्रेंडने दिला नकार

PAK vs AUS T20I : Babar Azam मुळे तरुणाला रहावे लागणार बॅचलर; पूर्ण न झालेल्या डिमांडमुळे गर्लफ्रेंडने दिला नकार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

PAK vs AUS T20I : ऑस्ट्रेलियाने २४ वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये जाऊन कसोटी मालिका व एकमेव ट्वेंटी-२० सामना जिंकला. वन डे मालिकेत पाकिस्तानने २-१ असा विजय मिळवला असला तरी या संपूर्ण दौऱ्यावर ऑस्ट्रेलियाचेच वर्चस्व जाणवले. आज ऑस्ट्रेलियन खेळाडू पाकिस्तानातून मायदेशात जाण्यासाठी रवाना झाले आहेत, तर इंडियन प्रीमिअर लीगमध्ये ( IPL 2022) खेळणारे खेळाडू मुंबईत दाखल होणार आहे.  आयपीएलमध्ये सध्या विविध पोस्टर्सनी लक्ष वेधले आहे, तसाच एक पोस्टर पाकिस्तान विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या ( Pakistan vs Australia T20I) एकमेव ट्वेंटी-२० सामन्यादरम्यान झळकला अन् त्यामुळे तरुणाला आता बॅचलर रहावे लागणार आहे.

वन डे मालिका विजयानंतर पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० सामना जिंकण्यासाठी मैदानावर उतरला. प्रथम फलंदाजी करून त्यांनी ८ बाद १६२ धावा केल्या. मोहम्मद रिझवान ( २३) व कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यांनी पाकिस्तानला सुरुवात चांगली करून दिली, परंतु रिझवानच्या विकेटनंतर रांग लागली. फाखर जमान ( ०), इफ्तिखार अहमद ( १३), आसिफ अली ( ३), हसन अली ( १०), शाहिन शाह आफ्रिदी ( ०) हे झटपट माघारी परतले. बाबरने ४६ चेंडूंत ६ चौकारांसह व २ षटकारांच्या मदतीने ६६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. उस्मान कादीरने ६ चेंडूंत १८ धावांची भर घातली. ऑस्ट्रेलियाच्या नॅथन एलिसने २८ धावांत ४ विकेट्स घेतल्या. कॅमेरून ग्रीननेही दोन बळी टीपले.

प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे फलंदाजही ढेपाळले. कर्णधार आरोन फिंचने ५५ धावांची खेळी करून संघर्ष केला. ट्रॅव्हिस हेड ( २६), जोश इंग्लिस ( २४), मार्कस स्टॉयनिस ( २३) व बेन मॅकडेर्मोट ( २२*) यांनी योगदान देत ऑस्ट्रेलियाचा विजय साकारला. ऑस्ट्रेलियाने १९.१ षटकांत ७ बाद १६३ धावा केल्या. शाहिन आफ्रिदी, उस्मान कादीर व मोहम्मद वसिम यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. पण, पाकिस्तानच्या पराभवामुळे तरुणीने बॉयफ्रेंडला होकार दिलाच नाही. 

आज जर पाकिस्तान जिंकली, तर मी याला हो म्हणेन, असा मजकूर लिहिलेलं पोस्टर ही तरुणी हातात घेऊन उभी होती आणि पाकिस्तानचा पराभव झाला. 

Web Title: Feel for this guy: If Pakistan wins, i will say Yes, girl poster goes viral and Australia beat Pakistan by 3 wickets (with 5 balls remaining)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.