नवी दिल्ली - हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर ॲंजिओप्लास्टी शस्त्रक्रियेला सामोरे गेलेले माजी दिग्गज क्रिकेटपटू कपिलदेव यांनी,‘ आता फार बरे वाटते,’असे व्हिडिओ संदेशात म्हटले आहे. १९८३ चा विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार राहिलेले ६१ वर्षांचे कपिलदेव यांनी सहकाऱ्यांचे आभार मानून आपल्याला आता फार हलके वाटत असून तुम्हा सर्वांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. सध्या ते घरी विश्रांती घेत आहेत. कपिल पुढे म्हणाले,‘ १९८३ चे माझे कुटुंबीय. मौसम सुहाना है, दिलकश जमाना है,आप सब से मिलने का मन कर रहा है!’ माझी काळजी केल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.’नारंगी रंगाचा शर्ट घातलेले कपिल यांनी हा व्हिडिओ सहकाऱ्यांना शेअर केला. त्यात ते पुढे म्हणाले,‘ संपणार असले तरी पुढच्या वर्षाची सुरुवात लवकरच होणार आहे. ही सुरुवात फार चांगली होईल,यात शंका नाही. तुम्हा सर्वांना लवकरच भेटणार आहे. सर्वांवर भरपूर प्रेम करतो.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आता फार बरे वाटते: कपिल देव
आता फार बरे वाटते: कपिल देव
Kapil Dev News : १९८३ चा विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार राहिलेले ६१ वर्षांचे कपिलदेव यांनी सहकाऱ्यांचे आभार मानून आपल्याला आता फार हलके वाटत असून तुम्हा सर्वांची भेट घेण्यास उत्सुक असल्याचे सांगितले. सध्या ते घरी विश्रांती घेत आहेत.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2020 3:43 AM