कोलकाता : भारतात उद्यापासून ऐतिहासिक सामन्याला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात गुलाबी चेंडूं वापरण्यात येणार आहे. पण या गुलाबी चेंडूने फिल्डिंग करणे आव्हानात्मक असेल,असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
याबाबत विराट म्हणाला की, " गुलाबी चेंडू हा थोडा जड आहे. हॉकीच्या चेंडूसारखा तो मला भासला. त्यामुळे गुलाबी चेंडूने फिल्डिंग करणे सोपे नसेल. कारण चेंडू जोरात आला तर तुम्हाला दुखापत होऊ शकते. त्यामुळे गुलाबी चेंडूने फिल्डिंग करणे आव्हानात्मक असेल."
या सामन्यासाठी भारतीय संघ, कोलकातावासिय, बीसीसीआय सारेच सज्ज झाले आहेत. पण या सामन्यासाठी तुम्ही सज्ज आहात का, असा प्रश्न भारतीय संघातील खेळाडू विचचारत आहेत.
ऐतिहासिक सामन्याच्या काही तासांपूर्वी बीसीसीआयने एक व्हिडीओ आपल्या ट्विटर हँडलवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली, भारताता कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, मयांक अगरवाल, मोहम्मद शमी, इशातं शर्मा, उमेश यादव, वृद्धिमान साहा, कुलदीप यादवसारखे बरेच क्रिकेटपटू आहेत. या सर्व खेळाडूंनी चाहत्यांना या सामन्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले आहे.
पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल विराट कोहलीने केला मोठा खुलासा, सांगितले का रद्द करावा लागला सामना
मुंबई : भारतामध्ये पहिल्या डे नाइट टेस्ट सामना उद्यापासून सुरु होणार आहे. या ऐतिहासिक सामन्याची सर्वांनाच उत्सुकता आहे. पण पहिल्या पहिल्या डे नाइट टेस्टबद्दल भारताचा कर्णधार विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. हा सामना रद्द का करावा लागला, याबद्दल कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.
भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये उद्यापासून पहिल्या डे नाइट टेस्ट मॅचला सुरुवात होणार आहे. भारतामध्ये पहिल्यांदाच डे नाइट टेस्ट मॅच खेळवण्यात येणार आहे. पण यापूर्वीही भारताची एक डे नाइट टेस्ट मॅच होणार होती. पण या मॅचचे नेमके काय झाले, याबाबत कोहलीने आपले मत व्यक्त केले आहे.
भारताचा संघ गेल्यावेळी जेव्हा ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. तेव्हा भारताचा संघ कसोटी मालिकाही खेळणार होता. या कसोटी मालिकेत भारताने एक सामना डे नाइट खेळावा, अशी ऑस्ट्रेलियाने विनंती केली होती. पण भारताने ही विनंती मान्य केली नाही. भारताने डे नाइट टेस्ट खेळायला तेव्हा का नकार दिला, याबाबत कोहलीने स्पष्टीकरण दिले आहे.
या बाबत कोहली म्हणाला की, " डे नाइट कसोटी खेळणे सोपे नसते. या सामन्यांमध्ये गुलाबी चेंडू वापरला जातो. या चेंडूचा तुम्हाला चांगला सराव असेल तरच तुम्ही डे नाइट टेस्ट खेळू शकता. ही गोष्ट पटकन स्वीकारण्यासारखी नक्कीच नाही. जर ही गोष्ट फार पूर्वी ठरली असती तर आम्ही विनंती स्वीकारून डे नाइट टेस्ट मॅच खेळलो असतो. पण ऐनवेळी या गोष्टी ठरवून होणार नाही."
Web Title: Fielding with the pink ball will be challenging, says Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.