ठळक मुद्देकोलंबियाला जर बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना या सामन्यात विजय मिळणे अनिवार्य आहे.
मॉस्को : कोलंबियासारख्या नावाजलेल्या संघाला जर फुटबॉल विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांच्याकडे फक्त 45 मिनिटांचा अवधी असेल. कारण सेनेगल विरुद्धच्या अखेरच्या साखळी सामन्याच्या पहिल्या सत्रात त्यांना एकही गोल करता आलेला नाही. पहिल्या सत्रात कोलंबिया आणि सेनेगल यांची 0-0 अशी बरोबरी आहे.
सध्याच्या घडीला ' एच ' गटामध्ये सेनेगलचा संघ पाच गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे, तर कोलंबियाचा संघ चार गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. जर हा सामना बरोबरीत सुटला तर सेनेगल बाद फेरीत पोहोचेल. त्यामुळे कोलंबियाला जर बाद फेरीत पोहोचायचे असेल तर त्यांना या सामन्यात विजय मिळणे अनिवार्य आहे.