Fifth Test between England and India cancelled: भारत आणि इंग्लंड यांच्यात आजपासून मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्यामुळे बीसीसीआय आणि इंग्लंड क्रिकेट बोर्डानं कसोटी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतीय क्रिकेट संघाचे ज्युनिअर फिजिओ योगेश परमार यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. योगेश यांच्याआधी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण आणि फिल्डिंग कोच आर. श्रीधर यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. भारतीय संघाने कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेऊन गुरुवारी सरावही रद्द केला होता. सर्व खेळाडू आपल्या खोल्यांमध्ये बंद आहेत.
दरम्यान, टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती काल रात्री उशिरा जाहीर करण्यात आली आहे. खेळाडू कोरोना निगेटिव्ह आलेले असले तरी कसोटी सामना खेळण्याबाबत साशंकता वर्तविण्यात येत होता. कारण या कसोटी मालिकेनंतर आयपीएल आणि पुढे टी-२० विश्वचषकाचं आयोजन आहे. त्यामुळे अशावेळी महत्त्वाच्या खेळाडूंना कोरोनाची लागण होणं हे परवडणारं नाही. त्यामुळेच खबरदारी म्हणून पाचवी कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Web Title: Fifth Test between England and India cancelled
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.