Join us  

ही लढाई विश्वचषकापेक्षा मोठी, कोच रवी शास्त्री

कोच रवी शास्त्री : कोरोना व्हायरसला हरवून मानवतेचा विश्वचषक जिंकू या...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 3:11 AM

Open in App

नवी दिल्ली : ‘कोरोनाविरुद्ध लढाई ही सर्वच विश्वचषकांच्या तुलनेत मोठी असल्याचे मत व्यक्त करीत भारतीय क्रिकेट संघाचे कोच रवी शास्त्री यांनी व्हायरसला हरवूया आणि मानवतेचा विश्वचषक जिंकूया,’ असे आवाहन बुधवारी केले.

कोरोना व्हायरसमुळे जगात भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना व्हायरसचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने झुंज देत आहे. क्रीडा विश्वालाही कोरोनाचा बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. कोरोनाचा फैलाव आणि प्रादुर्भाव कमी होत नसल्याने यंदा आयपीएल रद्द होण्याच्या मार्गावर आहे. याशिवाय, टी २० विश्वचषकाचे आयोजनदेखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. अशावेळी रवी शास्त्री यांनी ‘खास’ विश्वचषक जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला. (वृत्तसंस्था)खेळाडूंना चार्टर्ड विमानाने आणा, स्पर्धा रद्द नका करू!मेलबर्न : आॅस्टेÑलियाने यजमान म्हणून टी२० विश्वचषक स्पर्धेच्या आयोजनासाठी पूर्ण प्रयत्न केले पाहिजेत. पाहिजे तर यासाठी एक महिन्याआधी स्पर्धक संघांना चार्टर्ड विमानाने आणा आणि त्यांची कोरोना चाचणीही करा, पण विश्वचषक स्पर्धा रद्द करू नका,’ अशी विनंती आॅस्टेÑलियाचा माजी फिरकीपटू ब्रॅड हॉग याने केली आहे.‘खेळ तुम्हाला जीवनात असे काही धडे देतो, ज्याचा तुम्हाला कुठेही वापर करता येतो. सध्या आपण सारे कोरोनाच्या तडाख्यात आहोत. कोरोनाशी संघर्ष करणे म्हणजे विश्वचषक जिंकण्यासारखे आहे. कोरोना हा सर्वच विश्वचषकांचा बाप आहे. हा विश्वचषक जिंकण्यासाठी आपण सर्वस्व पणाला लावायला हवे. या विश्वचषकासाठी आपण फक्त ११ नव्हे तर एक अब्ज ४० कोटी लोक मैदानात आहोत आणि कोरोनाला पळवून लावू या आणि मानवतेसाठी विश्वचषक जिंकू या,’ असा संदेश शास्त्री यांनी टिष्ट्वटरवर व्हिडिओतून दिला आहे.

टॅग्स :रवी शास्त्रीकोरोना वायरस बातम्या