Join us  

केकेआर व मुंबईच्या बलाढ्य फलंदाजांदरम्यान लढत

शुभमन-रसेलपुढे रोहित-हार्दिकचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2020 2:09 AM

Open in App

अबुधाबी : कोलकाता नाईट रायडर्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात बुधवारी होणाऱ्या सामन्यात आक्रमक फलंदाजांची लढाई अनुभवाला मिळणार आहे. सलामीला पराभूत झालेला रोहितचा मुंबई संघ विजयाचे खाते उघडण्यास उत्सुक असेल.

मुंबई २०१३ पासून कधीच पहिला सामना जिंकलेला नाही. यावेळीही पहिल्या लढतीत त्यांना गत उपविजेत्या चेन्नई सुपरकिंग्सने पराभूत केले. मुंबई विजयी मार्गावर परतण्यास प्रयत्नशील आहे तर केकेआर संघ विजयी सुरुवात करण्यास आतुर आहे. दोन्ही संघांमध्ये बिग हिटर्सचा भरणा आहे.शुभमन गिलची ही तिसरी आयपीएल स्पर्धा आहे. तो मैदानावर चौफेर षटकार ठोकण्यात माहीर आहे. तर ‘हिटमॅन’ रोहित शर्मा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील शहेनशहा आहे. त्याच्या व शुभमन यांच्या बॅटदरम्यानची लढत बघण्याची उत्सुकता आहे.

दुखापतीतून सावरलेल्या पांड्यामध्ये सुनील नारायण व कुलदीप यादव यांच्यासह केकेआरचा सर्वांत महागडा खेळाडू पॅट कमिन्सला सडेतोड उत्तर देण्याची क्षमता आहे. रसेल सध्या टी-२० क्रिकेटमधील सर्वांत धोकादायक फलंदाज आहे.गेल्या मोसमात ५२ षटकार ठोकणाºया रसेलने फलंदाजी क्रमात त्याला तळाच्या फळीत पाठविण्याच्या संघव्यवस्थापनाच्या निर्णयावर टीका केली होती. यावेळी त्याला तिसºया क्रमांकावर खेळविण्याचे आश्वासन देण्यात आले. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघांची चिंता वाढली आहे.

केकेआर संघाचा मेंटर डेव्हिड हस्सीने अलीकडेच म्हटले होते, ‘जर आम्हाला सामना जिंकण्यासाठी मदत होणार असेल तर रसेलला तिसºया क्रमांकावर खेळविण्यात हरकत नाही. रसेल तिसºया क्रमांकावर ६० चेंडू खेळत द्विशतकही ठोकू शकतो. तो काहीही करण्यास सक्षम आहे.’टी-२० क्रिकेट केवळ बॅट व तंत्राच्या कौशल्यावर मर्यादित राहिलेले नाही. त्यात ताकदीचाही प्रभावही महत्त्वाचा ठरत आहे. त्यामुळे हार्दिक पांड्या अणि आंदे रसेल यांच्यादरम्यानची झुंज अनुभवाला मिळणार आहे.वेदर रिपोर्ट । तापमान ३८ डिग्री सेल्सियसपर्यंत राहील. वाºयाचा वेग २१ किलोमीटर प्रतितास राहण्याची शक्यता.पिच रिपोर्ट । खेळपट्टी फिरकीपटूंना अनुकूल. त्यामुळे फलंदाज जोखीम पत्करण्याचा प्रयत्न करणार नाहीत.मजबूत बाजूमुंबई । आकड्याचा विचार केला तर मुंबईची (२५ पैकी १९ विजय) बाजू सरस आहे.केकेआर। मॅचविनर्सचा समावेश आहे. इयोन मोर्गन संघासोबत जुळल्यामुळे ताकद वाढली आहे.कमजोर बाजूमुंबई । यूएईमध्ये आतापर्यंत केलेल्या निराशाजनक कामगिरीतून हा संघ सावरलेला नाही.केकेआर । संघाने अद्याप पहिली लढत खेळलेली नाही, पण दिनेश कार्तिकच्या कर्णधारपदावर मात्र प्रश्न उपस्थित करण्यात येऊशकतो.

टॅग्स :IPL 2020