मुंबई : इंडियन प्रीमियर लीगचे १३ वे सत्र संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये भरवण्याच्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निर्णयाला एका वकिलाने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. केंद्र सरकारने वेळोवेळी लॉकडाऊनचे नियम शिथिल करीत मॉल, हॉटेल, पार्क सुरू करण्याची परवानगी दिली. त्यामुळे आयपीएलचे सामनेही सर्व आवश्यक ती काळजी घेऊन खेळले जाऊ शकतात. त्यामुळे बीसीसीआयला देशातच सामने भरविण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.देशाबाहेर आयपीएलचे सामने भरविण्यात आले तर देशाला फार मोठा आर्थिक फटका बसेल, असे पुण्याचे रहिवासी व व्यवसायाने वकील असलेले अभिषेक लागू यांनी याचिकेत म्हटले आहे. २०१९ मध्ये आयपीएलची ब्रँड व्हॅल्यू ४७५ अब्ज रुपये होती. बीसीसीआयच्या उत्पन्नाचे हे मुख्य स्रोत आहे. या याचिकेवर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे.कोरोनामुळे आयपीएलचे सामने पुढे ढकलण्यात आले. बीसीसीआयने २ आॅगस्ट रोजी निर्णय घेतला की, १९ सप्टेंबर आणि १० नोव्हेंबरच्या कालावधीत दुबईच्या शारजाह आणि अबुधाबीच्या स्टेडियममध्ये हे सामने भरविण्यात येणार आहेत. मात्र, केंद्र सरकारच्या परवानगीच्या अधीन राहूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- ‘आयपीएलचे सामने देशातच भरवा’
‘आयपीएलचे सामने देशातच भरवा’
बीसीसीआयला देशातच सामने भरविण्याचे निर्देश द्यावे, अशी मागणी याचिकादारांनी केली आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2020 3:19 AM