Join us  

कोण असतील ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे 'सुपर 12'; अंतिम वेळापत्रक जाहीर

पापुआ न्यू गिनी, नामिबिया, नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड यांच्यानंतर आता ओमान संघाने पात्रता फेरीचा अडथळा पार करताना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2019 3:10 PM

Open in App

पापुआ न्यू गिनी, नामिबिया, नेदरलँड्स, आयर्लंड, स्कॉटलंड यांच्यानंतर आता ओमान संघाने पात्रता फेरीचा अडथळा पार करताना ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या मुख्य फेरीत प्रवेश केला. ICC Men's T20 World Cup Qualifier स्पर्धेच्या प्ले ऑफ लढतीत ओमानने नाट्यमयरित्या हाँगकाँगचा पराभव केला. ओमानचे 7 बाद 134 धावांचे आव्हान पार करण्यात हाँगकाँगला अपयश आलं. ओमानने हा सामना 12 धावांनी जिंकला. ओमानच्या या विजयानं वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम 16 संघ निश्चित झाले आहेत. पण, आता उत्सुकता लागली आहे ती 'सुपर 12'ची... त्यासाठीचे अंतिम वेळापत्रक आयसीसीनं आज जाहीर केले आहे.

2020 च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम 16 संघ ठरले, जाणून घ्या सर्व काही

18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियात पार पडणाऱ्या या स्पर्धेत 12 संघांमध्ये जेतेपदाची चुरस रंगणार आहे. जागतिक क्रमवारीनुसार अव्वल दहा संघ आधीच निश्चित झाले आहेत. पण, यातील नवव्या व दहाव्या स्थानावरील संघ सुपर बाराच्या उर्वरित चार स्थानांसाठी अन्य 6 संघांविरुद्ध खेळेल. पाकिस्तान, भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया ( यजमान) , दक्षिण आफ्रिका, न्यूझीलंड, वेस्ट इंडिज आणि अफगाणिस्तान या संघांनी आयसीसीच्या जागतिक क्रमवारीत स्थानाच्या जोरावर सुपर 12 मधील स्थान पक्कं केलं आहे. त्यामुळे उर्वरित 4 स्थानांसाठी आठ संघांमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. पात्रता फेरीनंतर त्यातील सर्व संघ निश्चित झाले आहेत आणि त्यांचे वेळापत्रक आज जाहीर झाले.

18 ते 23 ऑक्टोबर या कालावधीत सुपर 12 साठीच्या उर्वरित चार जागांसाठी स्पर्धा होणार आहे. या आठ संघांची विभागणी A आणि B अशा दोन गटांत करण्यात आली आहे. या गटाचा सलामीचा सामना श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात होणार आहे. श्रीलंकेसमोर A गटात पापुआ न्यू गिनी, आयर्लंड आणि ओमान यांचे आव्हान असेल, तर B गटात बांगलादेश, नेदरलँड्स, नामिबिया आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. 

A गटाचे सामने 18 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध आयर्लंड18 ऑक्टोबर - पापुआ न्यू गिनी विरुद्ध ओमान20 ऑक्टोबर - आयर्लंड विरुद्ध ओमान            20 ऑक्टोबर - श्रीलंका विरुद्ध पापुआ न्यू गिनी22 ऑक्टोबर - पापुआ न्यू गिनी विरुद्ध आयर्लंड22 ऑक्टोबर -  श्रीलंका विरुद्ध ओमान

B गटाचे सामने19 ऑक्टोबर - बांगलादेश विरुद्ध नामिबिया19 ऑक्टोबर - नेदरलँड्स विरुद्ध स्कॉटलंड21 ऑक्टोबर - नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड21 ऑक्टोबर -बांगलादेश विरुद्ध नेदरलँड्स23 ऑक्टोबर -  नेदरलँड्स विरुद्ध नामिबिया23 ऑक्टोबर -  स्कॉटलंड विरुद्ध बांगलादेश 

टॅग्स :आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020आयसीसी